टी-शर्टच्या या विचित्र डिझाईनवरुन सोशल मीडियात महाभारत, किंमत वाचून हडबडून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 13:13 IST2018-06-01T13:13:56+5:302018-06-01T13:13:56+5:30

अशाच एका विचित्र फॅशनवर सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एका फॅशन हाऊसने एक विचित्र फॅशन समोर आणली आहे. 

balenciaga t-shirt shirt fashion goes viral on social media | टी-शर्टच्या या विचित्र डिझाईनवरुन सोशल मीडियात महाभारत, किंमत वाचून हडबडून जाल!

टी-शर्टच्या या विचित्र डिझाईनवरुन सोशल मीडियात महाभारत, किंमत वाचून हडबडून जाल!

मुंबई : आजकाल फॅशनच्या नावावर काहीही केलं जात असल्याचं पावलोपावली बघायला मिळतं. अशाच एका विचित्र फॅशनवर सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एका फॅशन हाऊसने एक विचित्र फॅशन समोर आणली आहे. 

बॅलेंसियागा या फॅशन हाऊसने एक नवीन डिझाईन रिलीज केलं असून त्याचीच चर्चा होतीये. बॅलेंसियागाने एक टी-शर्ट शर्ट लॉन्च केलंय. म्हणजे एका टी-शर्टवर एक शर्ट चिकटवलेलं आहे. हे विचित्र डिझाईन लोकांच्या पचनीच पडत नाहीये. 



 

यावर काही सोशल मीडिया यूजर्सनी गमतीदार कमेंटही केल्यात. एकाने म्हटले की, डिझायनरने लगेच नोकरी सोडली पाहिजे तर एकाने सांगितले की, जेव्हा तुम्ही खूप कन्फ्यूज असाल तेव्हा हा पर्याय चांगला राहील. 


बरं या डिझाईनमुळे तर लोक प्रश्नात पडलेच आहेत. सोबतच या टी-शर्ट शर्टच्या किंमतीनेही थक्क झाले आहेत. तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, या टी-शर्ट शर्टची किंमत तब्बल 85 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आता या सगळ्यावरुन सोशल मीडियात या डिझाईनची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. 

Web Title: balenciaga t-shirt shirt fashion goes viral on social media