इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:44 IST2025-07-17T13:43:44+5:302025-07-17T13:44:35+5:30
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाने सीरिया युद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरताना दिसतेय.

इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
Baba Vanga prediction about Syria: गेल्या काही वर्षांपासून मध्यपूर्वेत अनेक ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यात प्रामुख्याने इस्रायलची भूमिका महत्वाची आहे. आधी तुर्की आणि आता इस्रायलने काल अचानक सीरियाची राजधानी दमास्कसवर हवाई हल्ला केला. या तणावाबाबत बाबा वेंगा यांची आणखी एक भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे.
प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यकार बाबा वेंगा यांच्या भाकितांनुसार, तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात सीरियाच्या विनाशाने सुरू होईल.
सीरियाबद्दलचे भाकित खरे ठरले
सीरियाबद्दल भाकित करताना बाबा वेंगाने म्हटले होते की, सीरियाचे पतन जागतिक संघर्षाचे कारण असेल. सीरियाच्या विनाशानंतर पश्चिम आणि पूर्वेकडील देशांमध्ये युद्ध सुरू होईल. इस्रायलने काल सीरियाची राजधानी दमास्कसवर हवाई हल्ला केला, त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सीरिया-इस्रायल संघर्षाबाबत बाबा वेंगा यांचे भाकित सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहेत. जर बाबा वेंगा यांचे भाकीत खरे ठरले, तर येणाऱ्या काळात सीरियाला मोठ्या विनाशाला सामोरे जावे लागू शकते. यासोबतच, ते तिसऱ्या महायुद्धाचे कारणही बनू शकते.
कोण होते बाबा वेंगा ?
बाबा वेंगा बल्गेरियातील एक भविष्यकार होते. त्यांचे १९९६ मध्ये निधन झाले, मात्र मरण्यापूर्वी त्यांनी ५०७९ पर्यंत भाकिते केली होती, ज्यामध्ये जगाचा अंत देखील समाविष्ट आहे. त्यांनी केलेल्या भाकितांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही, मात्र त्यांच्या अनुयायांचा बाबा वेंगा यांच्या भाकित्यांवर अढळ विश्वास आहे. बाबा वेंगा यांच्या भाकित्यांमध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन, ९/११ दहशतवादी हल्ला, २००४ ची सुनामी, बराक ओबामा यांचे राष्ट्राध्यक्ष होणे, सीरियातील गृहयुद्ध आणि युरोपमधील संकट यांचा समावेश आहे. बाबा वेंगा यांची बहुतांश भाकिते खरी ठरली आहेत.