अजब लव्हस्टोरी! तो 15 हजार किलोमीटर दूर तुरूंगात कैद, तरूणी रोज लिहिते त्याला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 16:05 IST2023-04-12T16:03:11+5:302023-04-12T16:05:03+5:30
Love Story : 29 वर्षीय सवानाहनुसार, तिचा 31 वर्षीय बॉयफ्रेंड एलेक्समध्ये ते सगळे गुण आहेत जे तिला तिच्या पार्टनरमध्ये हवे होते.

अजब लव्हस्टोरी! तो 15 हजार किलोमीटर दूर तुरूंगात कैद, तरूणी रोज लिहिते त्याला पत्र
Love Story : प्रेम कधी कुणावर जडेल हे काही सांगता येत नाही. तसंच प्रेम आंधळं असतं असंही म्हटलं जातं. असंच एका तरूणीसोबत झालंय. सवानाह फीफर नावाच्या महिलेसोबतही असंच झालं. पण हे फारच अजब झालंय. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी सवानाह FIFO वर्कर आहे आणि अनेक वर्ष वेगवेगळ्या नात्यांमध्ये दगा मिळाल्यानंतर तिला जो जोडीदार मिळाला तो तिला 15 हजार किलोमीटर दूर राहतो. इतकंच नाही तर तो तुरूंगात कैद आहे.
29 वर्षीय सवानाहनुसार, तिचा 31 वर्षीय बॉयफ्रेंड एलेक्समध्ये ते सगळे गुण आहेत जे तिला तिच्या पार्टनरमध्ये हवे होते. तो स्वीट आहे, केअरिंग आहे आणि तिच्यावर खूप प्रेमही करतो. फक्त एकच अडचण आहे की, एलेक्स एका अमेरिकन कैदी आहे आणि नेवाडाच्या तुरूंगात तिच्यापासून 15 हजार किलोमीटर दूर राहतो.
सवानाह आणि एलेक्स Write A Prisoner सेवेच्या माध्यमातून एकमेकांना पत्र लिहितात. ही एक अशी सुविधा आहे ज्याद्वारे लोक अमेरिकेतील तुरूंगांमध्ये बंद कैद्यांसोबत पत्राव्दारे संवाद साधतात. सवानाहने सांगितलं की, तिने इतर कैद्यांना देखील पत्र लिहिलं होतं, पण त्यांचं काही उत्तर आलं नाही. पण एलेक्सने तिला पत्र पाठवलं.
सवानाहने सांगितलं की, एलेक्स आणि मी संवाद सुरूच ठेवला. मला कधीच वाटलं नव्हतं की, मी त्याच्या प्रेमात पडेन. नंतर आम्ही फोनवर बोलू लागलो. एकमेकांचा आवाज ऐकल्यावर आम्ही आणखी जवळ आलो. सवानाहने सांगितलं की, डिसेंबर 2022 मध्ये आमचं नातं सुरू झालं. पण आम्ही अजूनही भेटलेलो नाही. आता आम्ही आमचं नातं जाहीर केलं आहे.
एलेक्स तुरूंगातील लॅंडलाईनवरून दिवसातून दोनदा सवानाहला फोन करतो आणि तुरूंगाकडून कैद्यांना दिल्या जाणाऱ्या टॅबलेटवरून ई-मेलही करतो. सवानाह म्हणाली की, सगळं काही शानदार आहे आणि ती फार आनंदी आहे. ती एक दिवस एलेक्स तुरूंगातून बाहेर येण्याची वाट बघत आहे.