अरे बाप रे बाप! २५ वेगवेगळ्या पुरूषांसोबत पळून गेली होती महिला, मग पती म्हणाला असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 13:33 IST2021-09-09T13:32:56+5:302021-09-09T13:33:28+5:30

मध्य आसामच्या ढिंग लहकर गावात राहणारी महिला आणि तिच्या पतीला तीन अपत्य आहेत. सर्वात छोटा मुलगा तीन महिन्यांचा आहे.

Assam : Woman allegedly run away from her home 25 times in ten years | अरे बाप रे बाप! २५ वेगवेगळ्या पुरूषांसोबत पळून गेली होती महिला, मग पती म्हणाला असं काही...

अरे बाप रे बाप! २५ वेगवेगळ्या पुरूषांसोबत पळून गेली होती महिला, मग पती म्हणाला असं काही...

एकाचवेळी चक्रावून टाकणारी आणि हैराण करणारी ही घटना आहे आसाममधील. येथील नगांव जिल्ह्यातील एक विवाहित महिला गेल्या १० वर्षात कथितपणे आपल्या घरातून २५ वेळा पळून गेली आहे. टाइम्स नाउच्या वृत्तानुसार, महिलेच्या सासऱ्यांनी सांगितलं की, लग्नानंतर ती २० ते २५ वेळा वेगवेगळ्या पुरूषांसोबत पळून गेली होती. आता ती तिच्या घरी परतली आहे. असं असलं तरी तिचा पती म्हणाला की, तो तिला स्वीकार करायला तयार आहे.

मध्य आसामच्या ढिंग लहकर गावात राहणारी महिला आणि तिच्या पतीला तीन अपत्य आहेत. सर्वात छोटा मुलगा तीन महिन्यांचा आहे. याआधी जेव्हाही ती घरातून पळून गेली, तेव्हा तेव्हा ती मोजक्याच दिवसात घरी परतत होती. नुकतीच महिला तिच्या परिसरात राहणाऱ्या एका पुरूषासोबत पळून गेली होती. (हे पण वाचा : ही मॉडेल तिच्या आयुष्यात आहे अत्यंत दु:खी कारणं हिला कुणी मैत्रिणीच नाहीत, कारण ऐकुन बसेल धक्का....)

ड्रायव्हर आहे पती

महिलेचा पती ड्रायव्हर आहे. ४ सप्टेंबरला जेव्हा तो गॅरेजमधून घरी येत होता तेव्हा त्याला घरात पत्नी दिसली नाही. ती ३ महिन्यांच्या बाळाला शेजारच्या घरातील एका लहान मुलाकडे देऊन पळून गेली होती. ती शेजाऱ्यांना सांगून गेली होती की, ती बकऱ्यांसाठी चारा आणायला जाते. ती २२ हजार रूपये आणि काही दागिने घेऊन पळून गेली होती. तेच स्थानिकांनी आरोप लावला आहे की, महिलेचे लग्नानंतर तिच्या परिसरात राहणाऱ्या अनेक पुरूषांसोबत अनैतिक संबंध होते.
 

Web Title: Assam : Woman allegedly run away from her home 25 times in ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.