Video - सूत जुळलं! अमेरिकेतील तरुणीचं गावातील मुलावर प्रेम जडलं; लग्न केलं अन् आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 15:03 IST2023-01-21T14:56:32+5:302023-01-21T15:03:10+5:30

सिल्व्हिया अमेरिकेची आहे, तर कोरे केनियातील एका छोट्या गावातील आहे.

american girl fell in love with village boy got married and settled love story | Video - सूत जुळलं! अमेरिकेतील तरुणीचं गावातील मुलावर प्रेम जडलं; लग्न केलं अन् आता...

फोटो - आजतक

अमेरिकेतील एक मुलगी गावातील एका मुलाच्या प्रेमात पडली. आपल्या समाजाच्या प्रचारासाठी ती इथे आली होती. पण नंतर तिने इथेच लग्न केलं आणि राहिली. या कपलचं एक YouTube चॅनेल आहे, जिथे ते त्यांच्या दैनंदिन गोष्टी शेअर करत असतात. नुकत्याच आलेल्या एका व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या लव्ह लाईफबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तरुणीचं नाव सिल्विया बिचांग आहे तर तिच्या पतीचे नाव कोरे बिचांग आहे. 

सिल्व्हिया अमेरिकेची आहे, तर कोरे केनियातील एका छोट्या गावातील आहे. सिल्व्हियाच्या वडिलांचा अमेरिकेत व्यवसाय आहे. ती त्यांना सेक्रेटरी म्हणून मदत करायची. पण नंतर त्यांच्या समाजाच्या प्रचारासाठी मुलीला त्यांनी केनियाला पाठवलं. येथे येताना सिल्व्हिया कोरे याला भेटली. कोरे हा मोबाईलच्या दुकानात काम करायचा. जेव्हा ते पहिल्यांदा भेटले तेव्हा सिल्व्हिया त्याच्या दुकानात गेली होती. ही गोष्ट 2017 सालची आहे.

सिल्व्हिया आणि कोरो पहिल्या नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिले. काही आठवड्यांतच त्यांचे Whatsapp वर बोलणे सुरू झाले. मात्र, त्याचा मार्ग इतका सोपा नव्हता. सिल्व्हियाने सांगितले की, तिच्या पालकांना हे नाते मान्य नव्हते. पण, खूप समजावून सांगितल्यावर सिल्व्हियाच्या आई-वडिलांनी हे मान्य केले. सिल्व्हिया जवळपास वर्षभर अमेरिकेत राहिली.

जेव्हा सिल्व्हिया पुन्हा केनियाला परतली तेव्हा ती इथेच राहिली. तिने कोरेशी लग्न केले. या लग्नात दोघांचे नातेवाईक सहभागी झाले होते. आज त्यांच्या लग्नाला 1 वर्षाहून अधिक काळ झाला आहे. Sylvia आणि Koree चे YouTube वर Sylvia & Koree Bichanga नावाचे चॅनल आहे. येथे तो त्याच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गोष्टी शेअर करत असतो. यूट्यूब मधून कमावलेल्या पैशातून ते जगभर फिरतील आणि गोष्टी एक्सप्लोर करतील असं त्यांचं म्हणणं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: american girl fell in love with village boy got married and settled love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न