बाबो! डोनाल्ड ट्रम्प केवळ नेतेच नाही तर हॉलिवूडचे अभिनेतेही, बघा त्यांनी काम केलेल्या सिनेमांचे सीन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 14:24 IST2020-02-19T14:12:04+5:302020-02-19T14:24:37+5:30

हे सर्वांनाच माहीत आहे की, ट्रम्प हे जगातल्या सर्वात शक्तीशाली देशाचे नेते आहेत, पण त्यासोबतच ते एक अभिनेतेही असल्याचं फार कमी लोकांना माहीत असेल.

America President Donald Trump acted in many hollywood movies and tv series | बाबो! डोनाल्ड ट्रम्प केवळ नेतेच नाही तर हॉलिवूडचे अभिनेतेही, बघा त्यांनी काम केलेल्या सिनेमांचे सीन्स!

बाबो! डोनाल्ड ट्रम्प केवळ नेतेच नाही तर हॉलिवूडचे अभिनेतेही, बघा त्यांनी काम केलेल्या सिनेमांचे सीन्स!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी  मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या तयारी सुरू आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सोशल मीडिया आणि मीडियात होऊ लागली आहे. ट्रम्प यांच्याही कितीतरी गोष्टींची चर्चा रंगली आहे. हे सर्वांनाच माहीत आहे की, ट्रम्प हे जगातल्या सर्वात शक्तीशाली देशाचे नेते आहेत, पण त्यासोबतच ते एक अभिनेतेही असल्याचं फार कमी लोकांना माहीत असेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक हॉलिवूड सिनेमे आणि टीव्ही सीरीजमध्ये काम केलंय. त्यांच्या या सिनेमांचे व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत.

१९९९ मधील 'सेक्स एंड द सिटी' या टीव्ही सीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये ट्रम्प यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. 

या शोमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे सुपरस्टार मायकल फॉक्ससोबत दिसले होते. एका एपिसोडमध्ये मायकल बिझनेसमन ट्रम्प यांना आपल्या पुस्तकांबाबत सांगतो.

नंतर १९९७ मध्ये एका टीव्ही शोच्या एका एपिसोडमध्ये दिसले होते. 

१९९६ मध्ये आलेल्या एका कॉमेडी सिनेमातही ट्रम्प दिसले होते. यात त्यांनी त्यांचीच भूमिका निभावली होती.

१९९४ मध्ये या सिनेमातही ते पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले होते. यात ते फोनवर बोलताना मुलाला म्हणतात की, 'पैशांनी तुझ्यासारखा चांगला मुलगा विकत घेता येत नाही'.

१९९२ मध्ये आलेल्या या सिनेमात ट्रम्प यांनी काही सेकंदाची भूमिका साकारली होती. मजेदार बाब ही आहे की, त्यांचा सीन ज्या हॉटेलमध्ये शूट झाला होता ते हॉटेल ट्रम्प यांचच होतं. यासोबत ट्रम्प यांनी 'घोस्ट्स कांट डू इट', 'अक्रॉस द सी ऑफ टाइम', 'एडी', 'सेलिब्रिटी', 'झूलॅंडर' अशाही सिनेमात काम केलंय.


Web Title: America President Donald Trump acted in many hollywood movies and tv series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.