काय सांगता राव! पठ्ठ्यानं भारतातून अमेरिकेत नेल्या शेणाच्या गोवऱ्या; एअरपोर्टवरच कारवाई झाली अन् मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 16:47 IST2021-05-11T16:30:18+5:302021-05-11T16:47:49+5:30
Airport cow dung cakes : आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतातून आलेल्या एका प्रवाशाच्या सामानामधून गोवऱ्या ताब्यात घेतल्या आहेत.

काय सांगता राव! पठ्ठ्यानं भारतातून अमेरिकेत नेल्या शेणाच्या गोवऱ्या; एअरपोर्टवरच कारवाई झाली अन् मग....
परदेशात राहणारे भारतीय नेहमीच भारतातून परत बाहेरगावी जाताना आपल्या घरातील तसंच गावात उपलब्ध असलेल्या अनेक वस्तू स्वतः सोबत घेऊन जातात. अनेकदा विमानतळावरील तपासणी दरम्यान या वस्तू अडचणीचे कारण सुद्धा ठरू शकतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमेरिकेच्या सीमाशुल्क सीमा (custom duty) आणि सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टन डीसी उपनगरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतातून आलेल्या एका प्रवाशाच्या सामानामधून गोवऱ्या ताब्यात घेतल्या आहेत.
भारतातल्या गावागावात गोवऱ्या रोजच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. यज्ञ, पूजा यांसाठी कुठेही गेलात तरी गोवऱ्या लागतात. यापैकीच काही कारणांसाठी हा भारतीय माणूस गोवऱ्या घेऊन अमेरिकेला गेला असावा. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत शेणाच्या गोवऱ्यांवर बंदी आहे. कारण, या गोवऱ्यांमार्फत जनावरांमधील अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक असलेल्या (Foot-and-mouth disease ) नावाच्या रोगाचा प्रसार होतो. अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी गोवऱ्या नष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो
समोर आलेल्या माहितीनुसार ही सूटकेस 4 एप्रिलला एअर इंडियाच्या विमानातून परत आलेल्या एका प्रवाशाची आहे. सीबीपी कृषी तज्ज्ञांना एका सुटकेसमधून दोन शेणी सापडल्या होत्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत. कस्टम अॅण्ड बॉर्डर प्रोटेक्शनं दिलेल्या माहितीनुसार जगातील अनेक भागात शेणी स्वयंपाक करण्यासाठी इंधन म्हणून एक महत्त्वाचा घटक आहे.
नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
याचा वापर एक रोगप्रतिरोधक आणि खत म्हणूनही केला जातो. हे अनेक फायदे असूनही, जनावरांच्या तोंडाला जखमा करणाऱ्या आजाराच्या भीतीमुळे भारतातून शेणी घेऊन येण्यास मनाई आहे. असं मत सीबीपीनं स्पष्ट केलं आहे.