साप आपली शिकार किती दुरून बघू शकतात, पाहा माहीत नसतील सापांच्या 'या' खास गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:48 IST2026-03-18T15:48:19+5:302026-03-18T15:48:58+5:30
Amazing Facts About Snakes : बरेच लोक असा विचार करतात की, साप फार दुरूनच बघू शकतात की, त्यांची शिकार कुठे आहे. पण मुळात सत्य वेगळं आहे.

साप आपली शिकार किती दुरून बघू शकतात, पाहा माहीत नसतील सापांच्या 'या' खास गोष्टी
Amazing Facts About Snakes : साप जगातील सगळ्यात रहस्यमय जीवांपैकी एक मानले जातात. सोबतच सगळ्यात खतरनाकही. साप आपली शिकार दुरूनच बघू शकतात. पण मग प्रश्न असा पडतो की, साप आपली शिकार किती दुरून बघू शकतो. तेच जाणून घेऊया. बरेच लोक असा विचार करतात की, साप फार दुरूनच बघू शकतात की, त्यांची शिकार कुठे आहे. पण मुळात सत्य हे आहे की, सापाची बघण्याची क्षमता फार कमी असते. अशात आपली शिकार किती दूर आणि कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी साप शरीराच्या इतर अवयवांचा वापर करतात.
शिकार कुठे आहे याची माहिती सापांना लगेच मिळते, कारण ते यासाठी केवळ आपल्या डोळ्यांवर अवलंबून राहत नाही. साप आपली जीभ बाहेर काढून हवेत फिरवतात, या द्वारे ते आपल्या शिकारीचा गंध ओळखतात. सामान्यपणे साप आपल्या डोळ्यांनी स्पष्टपणे केवळ १ ते ३ मीटर म्हणजे ३ ते १० फुट दूरचंच बघू शकतात. किंग कोब्रासारख्या काही मोठ्या मोठ्या सापांची दूरचं बघण्याची क्षमता अधिक असते. ते साधारण १० ते १५ अंतरावरील गोष्टी बघू शकतात.
सापांना दूरच्या गोष्टी स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे ते आपली दुरची शिकार डोळ्यांनी बघू शकत नाही. साप दूर बसलेली आपली शिकार शोधण्यासाठी जिभेचा वापर करतात. जिभेद्वारेच त्यांना कळतं की, शिकार आजूबाजूला आहे की नाही. सापांना कान नसतात, पण त्यांना आजूबाजूला होणाऱ्या हालचालीची चांगलीच जाणीव असते. जमिनीवर होणाऱ्या हलक्या कंपणाने त्यांना गोष्टी कळतात. जर एखादा मनुष्य किंवा शिकार त्याच्याजवळ येत असेल तर त्यांना लगेच कळतं.
काही साप जसे की, वायपर, बोआ आणि अजगर आपल्या शिकारीच्या शरीरातून निघणारी उष्णता जाणवू शकतात. अशात संधी मिळताच साप त्यांच्यावर झडप घेतात. त्यांच्या डोक्यावर एक खास सेन्सर असतं, जे अंधारातही शिकार आसपास असल्याची माहिती देतं.