विमानातून सारे प्रवासी उतरले की काय करावे लागते? एअर होस्टेसचे काम संपते? थांबा... खरं 'मिशन' तर तिथूनच सुरू होतं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 20:12 IST2026-02-03T20:11:26+5:302026-02-03T20:12:57+5:30
Air Hostess Duties After Landing: विमान लँड झालं की एअर होस्टेसचं काम संपलं, असं तुम्हालाही वाटतं का? ✈️ प्रत्यक्षात मात्र त्यांची खरी धावपळ तेव्हाच सुरू होते.

विमानातून सारे प्रवासी उतरले की काय करावे लागते? एअर होस्टेसचे काम संपते? थांबा... खरं 'मिशन' तर तिथूनच सुरू होतं!
विमानात एअर होस्टेसला पाहिल्यावर आपल्याला वाटतं की, त्यांचे काम फक्त प्रवाशांचे स्वागत करणे आणि जेवण देणे इतकेच आहे. विमान जमिनीवर उतरले की त्याही प्रवाशांसोबत आरामात बाहेर पडत असतील, असा आपला समज असतो. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. विमान लँड झाल्यानंतर पुढच्या उड्डाणासाठी तयार होईपर्यंतच्या त्या २० ते ३० मिनिटांत एअर होस्टेसना किती कसरत करावी लागते, याचा उलगडा नुकताच झाला आहे.
प्रवासी विमानातून बाहेर पडल्यानंतर एअर होस्टेसची खरी ड्युटी सुरू होते. याला 'कॅबिन सिक्युरिटी चेक' आणि 'सर्व्हिस ट्रान्झिशन' असे म्हणतात. प्रत्येक प्रवाशाच्या सीटवर किंवा 'ओव्हरहेड बिन'मध्ये कोणी काही संशयास्पद वस्तू किंवा सामान विसरले आहे का, याची तपासणी करावी लागते. अनेकदा प्रवासी आपलं पाकीट, पासपोर्ट किंवा मोबाईल विसरतात. हे सामान एअरलाईनच्या 'लॉस्ट अँड फाऊंड' विभागाकडे सोपवण्याची जबाबदारी त्यांचीच असते. विमान लँड झाल्यावर सफाई कामगार येतात, पण त्यांच्यासोबत समन्वय साधणे, सीट कव्हर ठीक करणे आणि प्रत्येक सीटवर मॅगझिन किंवा सेफ्टी कार्ड आहे का, हे पाहणं एअर होस्टेसलाच करावे लागते. तसेच प्रत्येक उड्डाणापूर्वी आणि नंतर 'लाईफ जॅकेट्स' त्यांच्या जागी आहेत की नाही, हे त्यांना प्रत्यक्ष तपासावे देखील लागते.
जेवणाची आणि पाण्याचा हिशोब
विमानात किती जेवण शिल्लक आहे, पुढच्या ट्रिपसाठी किती 'मील ट्रे' लोड झाले आहेत आणि पिण्याच्या पाण्याची पातळी काय आहे, याचा रिपोर्ट त्यांना ग्राउंड स्टाफला द्यावा लागतो. हे सर्व काम इतक्या वेगात करावे लागतं की त्यांना स्वतःसाठी पाणी पिण्याइतकाही वेळ मिळत नाही.
विश्रांती नाही, तर 'ब्रीफिंग'
विमान लँड झाल्यावर त्यांना घरी जाता येत नाही. त्यांना पुढील उड्डाणासाठी 'कॅप्टन'सोबत ब्रीफिंगमध्ये सहभागी व्हावे लागते. खराब हवामान किंवा तांत्रिक गोष्टींची चर्चा या बैठकीत होते. त्यामुळे ग्लॅमरस दिसणाऱ्या या प्रोफेशनमध्ये शारीरिक आणि मानसिक कष्ट प्रचंड आहेत.