पाकिस्तानच्या सुंदर महिला कैदीच्या प्रेमात 'वेडा' झाला जेलर, जबरदस्तीने लग्नही केलं, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:26 IST2024-11-26T14:57:54+5:302024-11-26T15:26:46+5:30
झालं असं की, पाकिस्तानातील २१ वर्षीय तरूणी तिच्या प्रियकरासोबत पळून अफगाणिस्तानात आली. अफगानिस्तानात लग्नशिवाय कुणासोबत राहणं गुन्हा आहे.

पाकिस्तानच्या सुंदर महिला कैदीच्या प्रेमात 'वेडा' झाला जेलर, जबरदस्तीने लग्नही केलं, पण...
Jailer Prisoner Love: अफगाणिस्तानच्या एका तुरूंगातून एक अजब घटना समोर आली आहे. इथे जेलर तुरूंगात बंद असलेल्या पाकिस्तानी महिला कैदीच्या असा काही प्रेमात पडला की, त्याने सगळ्या सीमा पार केल्या. त्याचा हा कारनामा समोर आल्यावर त्याच्यावर अफगाणिस्तानमध्ये टिका केली जात आहे. जेलरची ही एकतर्फी प्रेम कहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच आहे.
झालं असं की, पाकिस्तानातील २१ वर्षीय तरूणी तिच्या प्रियकरासोबत पळून अफगाणिस्तानात आली. अफगानिस्तानात लग्नशिवाय कुणासोबत राहणं गुन्हा आहे. अशात तरूणी आणि तिच्या प्रियकराला अटक करून तुरूंगात टाकण्यात आलं. पण पाकिस्तानी तरूणी इथेच फसली.
तरूणीच्या सुंदरतेवर फिदा झाला जेलर
अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रदेशच्या तुरूंगाचे निर्देशक मुक्तदा हाफिज नसीरूल्लाह जेव्हा प्रदेशातील तुरूंगाचं निरीक्षण करत होते, तेव्हा त्याची नजर या पाकिस्तानी तरूणीवर पडली. २१ वर्षीय या तरूणीवर जेलरचं मन जडलं. त्याने लगेच तिला निकाह करण्याबाबत विचारलं. पण तरूणी नकार दिला.
तरूणीच्या प्रियकराला सोडलं...
तरूणीने नकार दिल्यावर जेलरसमोरचा मोठा अडथळा होता तिचा प्रियकर. जेलरने विचार केला की, जर तिच्या प्रियकराला बाजूला केलं तर तो तरूणीसोबत जबरदस्ती लग्न करू शकतो. तेव्हा जेलरने दुसऱ्या एका तुरूंगात बंद असलेल्या तरूणीच्या प्रियकराला शोधलं आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला या अटीवर सोडण्यात आलं की, तो कुणालाच सांगणार नाही की, त्याने पाकिस्तानी तरूणी सोबत आणली होती. जीवाच्या भितीने प्रियकराने अट मान्य केली. त्यानंतर जेलरने महिला कैद्याला सांगितलं की, तुझा प्रियकर पळून गेला. आता माझ्याशी लग्न कर.
लग्न केलं, पण...
पाकिस्तानी तरूणी आधी लग्नासाठी तयार नव्हतीच. तेव्हा जेलरने जबरदस्ती तिच्यासोबत लग्न केलं आणि तुरूंगातून बाहेर काढून तिला जलालाबादमध्ये एका भाड्याच्या घरात ठेवलं. मात्र, एका आठवड्यातच या लग्नाची खबर लोकांना लागली. त्यानंतर जेलरच्या समस्या वाढल्या. जेलरला नोकरीवरून काढण्यात आलं. त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.