फोन करून म्हणायचा - माझ्याशी लग्न करशील?, भर रस्त्यात अभिनेत्रीकडून स्पॉट बॉयची धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 16:37 IST2022-04-07T16:36:57+5:302022-04-07T16:37:21+5:30

Chhattisgarh : मीडिया रिपोर्टनुसार, बिलासपूरच्या तोरवामध्ये राहणारा तरूण छत्तीसगढी सिनेमांमध्ये स्पॉटबॉयचं काम करत होता.

Actress beat up spot boy on road video viral in Chhattisgarh | फोन करून म्हणायचा - माझ्याशी लग्न करशील?, भर रस्त्यात अभिनेत्रीकडून स्पॉट बॉयची धुलाई

फोन करून म्हणायचा - माझ्याशी लग्न करशील?, भर रस्त्यात अभिनेत्रीकडून स्पॉट बॉयची धुलाई

Chhattisgarh  : छत्तीसगढच्या बिलासपूरमध्ये एका रोड रोमिओची भर रस्त्याच धुलाई करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन तरूणींनी एका तरूणाला चप्पल आणि बुक्क्यांनी मार दिला. असं सांगितलं जात आहे की, तरूण जिला फोन लावत होता ती अभिनेत्री आहे. तो तिला फोन करून त्रास देत होता. त्याला अनेकदा समजावून सांगितल्यावरही तो ऐकला नाही आणि अखेर अभिनेत्री तरूणीने त्याला रस्त्यात धडा शिकवला.

मीडिया रिपोर्टनुसार, बिलासपूरच्या तोरवामध्ये राहणारा तरूण छत्तीसगढी सिनेमांमध्ये स्पॉटबॉयचं काम करत होता. छॉलीवूडमध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याने अनेक तरूणींने नंबर मिळवले होते. तो नंतर त्यांना त्रास देत होता. त्यांना फोन करून म्हणत होता की, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील का? मारहाण करणाऱ्या एका तरूणीलाही तो फोन करून असाच त्रास देत होता. 

तरूणीने त्याला अनेकदा समजावलं. पण त्याने तिला फोन करणं काही बंद केलं नाही. याची माहिती तरूणीने तिच्या मैत्रिणीला दिली. त्यानंतर त्याला धडा शिकवण्याासाठी त्यांनी तरूणाला एका ठिकाणी बोलवलं. तिथे तरूणी आधीच उपस्थित होत्या.

तरूण तिथे पोहोचताच त्याला बाइकवरून खाली उतरण्याचीही संधी तरूणींनी दिली नाही. चप्पल आणि चापटांनी त्याला चांगलाच चोप दिला. तरूणाला मार खाताना पाहून तिथे लोकांची गर्दी जमली होती. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कुणीतरी तरूणींचा तरूणाला मारहाण करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरूणींनी याची तक्रार पोलिसात दिली नाही. तरूणाला धडा शिकवल्यानंतर तरूणी तेथून निघून गेल्या. असंही सांगितलं जात आहे की, दोन तरूणींपैकी एक डेप्युटी कलेक्टरची मुलगी आहे. दोन्ही तरूण छत्तीसगढी सिनेमात अभिनेत्रींचं काम करतात.
 

Web Title: Actress beat up spot boy on road video viral in Chhattisgarh