इथे मुस्लिमांची संख्या जास्त पण हिंदू पद्धतीने सगळे करतात ज्वालामुखीची पूजा, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 01:10 PM2023-06-07T13:10:33+5:302023-06-07T13:10:43+5:30

Mount Bromo : या ज्वालामुखीची आश्चर्यजनक बाब म्हणजे याच्या टोकावर एक गणेसाचं मंदिर आहे. असं मानलं जातं की, या गणेशामुळेच येथील लोक सुरक्षित आहेत.

Active volcano mount bromo thousands Hindu worshipers reached for ritual in Indonesia | इथे मुस्लिमांची संख्या जास्त पण हिंदू पद्धतीने सगळे करतात ज्वालामुखीची पूजा, कारण...

इथे मुस्लिमांची संख्या जास्त पण हिंदू पद्धतीने सगळे करतात ज्वालामुखीची पूजा, कारण...

googlenewsNext

इंडोनेशियामध्ये हिंदू लोकांची संख्या कमी असली तरी इथे हिंदू मान्यतांना फार महत्व आहे. इंडोनेशियात 87 टक्के मुस्लिम राहतात, 10 टक्के ख्रिश्चन तर 1.6 टक्के हिंदू आणि 0.7 टक्के बौद्ध लोक राहतात. तरीही येथील करन्सीवर भगवान गणेशाचा फोटो आहे. येथील एका पर्वताला भगवान ब्रह्माचं नाव देण्यात आलं आहे. जावा भाषेत याला ब्रोमो (Mount Bromo) म्हटलं जातं.

इंडोनेशियामध्ये सध्या एकूण 141 ज्वालामुखी आहेत. ज्यातील 130 ज्वालामुखी सक्रिय आहेत आणि यांमध्ये कधीही स्फोट होत राहतात. यातीलच एक आहे माउंट ब्रोमो डोंगरावरील ज्वालामुखी. या ज्वालामुखीची आश्चर्यजनक बाब म्हणजे याच्या टोकावर एक गणेसाचं मंदिर आहे. असं मानलं जातं की, या गणेशामुळेच येथील लोक सुरक्षित आहेत.

माउंट ब्रोमोचा अर्थ स्थानिक भाषेत ब्रम्हा असा होतो. पण हे मंदिर गणेशाचं आहे. स्थानिकांचं असं मत आहे की, येथील मूर्ति 700 वर्षांपासून तिथेच आहे. जी त्यांच्या पूर्वजांनी स्थापित केली होती. मान्यतांनुसार, हीच गणेशाची मूर्ती ते ज्वालामुखीच्या इतक्या जवळ असूनही त्यांची रक्षा करत आली आहे.

हेच कारण आहे की, येथील एक समाज ज्याला Tenggerese नावाने ओळखलं जातं ते अनेक वर्षांपासून श्री गणेशाची पूजा करतात. या गणेशाच्या मंदिराला Pura Luhur Poten च्या नावाने ओळखले जाते. या मंदिराची खासियत म्हणजे इथे गणेशाच्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत आणि या सर्व मूर्ती ज्वालामुखीच्या गोठलेल्या लाव्हारसापासून तयार झाल्या आहेत.

माउंट ब्रोमोच्या आजूबाजूला जवळपास 30 गावे आहेत आणि यात या समाजाचे जवळपास 1 लाख लोक राहतात. हे लोक स्वत:ला हिंदू मानतात आणि ते हिंदू संस्कृती फॉलो करतात. पण काळानुसार त्यांच्या रितीरिवाजात काही बौद्ध रिवाजही जुळले गेले आहेत. जसे की, ते गणेश, ब्रम्हा आणि विष्णूसोबत बुद्धाचीही पूजा करतात.

Tenggerese समाजातील लोक दरवर्षी 14 दिवसांसाठी माउंट ब्रोमो डोंगरावरील गणेशांची पूजा करतात. या पूजेला Yadnya Kasada असं म्हटलं जातं. असे मानले जाते की, 13व्या ते 14 व्या शतकादरम्यान याची सुरूवात झाली होती. याबाबत एक लोककथा आहे ज्यानुसार, देवाने येथील अपत्य नसलेल्या राजा-राणीला 24 अपत्ये दिली. अट ही होती की, 25 वं आणि शेवटं अपत्य ते डोंगराला अर्पण करतील. त्यानंतर दरवर्षी पूजेचा सिलसिला सुरू झाला. आजही इथे बकऱ्यांची बळी दिला जातो.

सोबतच ज्वालामुखीच्या या बळीसोबत फळं-फूलं आणि भाज्याही अर्पण केल्या जातात. मान्यता आहे की, गणेशाची पूजा केल्याने आणि धगधगत्या ज्वालामुखीत फळं टाकल्याने विस्फोट टाळला जातो आणि असं केलं नाही तर हा समाज नष्ट होऊ शकतो.

या जमातीच्या लोकांचं एक वेगळं कॅलेंडर आहे. या कॅलेंडरनुसार दरवर्षी 14 दिवसांसाठी ही पूजा केली जाते. यादरम्यान इथे जत्रा असते. या जत्रेत अनेक परदेशी पर्यटकही सहभागी होता. पण ज्वालामुखीमुळे येथील तापमान अधिक राहतं. त्यामुळे श्वास घेण्यास समस्या असणाऱ्या पर्यटकांना इथे येण्यास मनाई केली जाते. येथील पूजा हिंदू संस्कृतीप्रमाणे केली जाते. इथेही पूजारी असतात आणि पुजाऱ्याचा मुलगाच पूजारी होतो.

Web Title: Active volcano mount bromo thousands Hindu worshipers reached for ritual in Indonesia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.