यूपीतलं एक अनोखं रेल्वे जंक्शन! ज्यान अमेरिका, चीन अन् जपानला मागे टाकलं, काय आहे खासियत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:08 IST2026-02-19T12:08:20+5:302026-02-19T12:08:53+5:30
मथुरा जंक्शन ना प्लॅटफॉर्मच्या संख्येत सर्वात मोठे आहे, ना तिथे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे आणि ना तिथे रोज येणाऱ्या ट्रेनची संख्या जास्त आहे

यूपीतलं एक अनोखं रेल्वे जंक्शन! ज्यान अमेरिका, चीन अन् जपानला मागे टाकलं, काय आहे खासियत?
तुम्ही उत्तर प्रदेशातील मथुरा जंक्शनचं नाव नक्कीच ऐकले असेल. कारण मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु याठिकाणी बांधण्यात आलेले जंक्शन आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर अमेरिका, चीन आणि जपानलाही या जंक्शनने मागे टाकले आहे हे ऐकून हैराण झाला असाल ना... परंतु हे खरे आहे. उत्तर प्रदेशातील हे छोटे जंक्शन केवळ देशातच नाही तर परदेशाच्या तुलनेत सर्वात मोठे जंक्शन आहे.
मथुरा जंक्शन ना प्लॅटफॉर्मच्या संख्येत सर्वात मोठे आहे, ना तिथे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे आणि ना तिथे रोज येणाऱ्या ट्रेनची संख्या जास्त आहे. तरीही हा देशातील विविध भागांना जोडणारे एकमेव जंक्शन आहे जिथून ७ दिशांमध्ये रेल्वे मार्ग जातात. जगातील कुठल्याही अन्य रेल्वे जंक्शनमध्ये अशी कनेक्टिविटी मिळत नाही. मथुरा जंक्शनवरून सात वेगवेगळ्या मार्गाने रेल्वे प्रवास करता येऊ शकतो. जो भारतातील इतर भागांना जोडतो.
कोणकोणते रेल्वे मार्ग?
उत्तर दिशेकडे दिल्ली आणि त्यापुढे अमृतसर पंजाबपर्यंत, दक्षिण पूर्व दिशेकडे आग्राहून दिल्ली-मुंबई, चेन्नई, हैदराबादसारखे मार्ग, पूर्व दिशेने कासगंज, लखनौ, गोरखपूर, बिहार आणि पूर्वांचलाकडील राज्ये, पश्चिम दिशेने आलवर, जयपूर, अहमदाबाद, गुजरातचा मार्ग, दक्षिण पश्चिमेकडे भरतपूर हून वडोदरा, मुंबई आणि दक्षिण भारत त्याशिवाय लोकल लाइनही या जंक्शनवर आहेत. मथुरेतून उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या चारही मुख्य दिशांशिवाय अनेक ब्रांच लाइननेही कनेक्टिविटी मिळते. याठिकाणी दिवसाला २०० हून अधिक ट्रेन जातात. त्यात राजधानी, शताब्दी, दुरांतो, सुपरफास्ट एक्सप्रेस आणि लोकल पॅसेंजर ट्रेनचा समावेश आहे. या स्टेशनवर एकूण १० प्लॅटफॉर्म आणि २१ रेल्वे मार्ग आहेत.
जगातील सर्वात मोठे जंक्शनशी तुलना अमेरिकेतील बेली यार्डशी होते. परंतु तिथे मुख्यत: मालगाडी येतात. प्रवासी ट्रेन जास्त येत नाही. कारण अमेरिकेत रेल्वे प्रवासी वाहतूक कमी आहे. जपानमधील शिनजुकु स्टेशन जगातील सर्वात व्यस्त स्टेशन आहे. इथं दिवसाला ३५ लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. परंतु तिथे बहुतांश मेट्रो आणि लोकल ट्रेन हब आहे.