टॅटू काढण्यापासून ते फ्लश करण्यापर्यंत, या देशांमध्ये विचित्र गोष्टींवर टॅक्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 14:52 IST2018-08-16T14:52:07+5:302018-08-16T14:52:45+5:30
कुणी तुम्ही सिंगल आहात म्हणून टॅक्स द्या किंवा शरीरावर टॅटू काढायचा असेल टॅक्स द्या, तर तुमचं काय रिअॅक्शन असेल? हे काल्पनिक नाहीये. कारण अशाप्रकारच्या विचित्र गोष्टींवर काही देशांमध्ये टॅक्स द्यावा लागतो.

टॅटू काढण्यापासून ते फ्लश करण्यापर्यंत, या देशांमध्ये विचित्र गोष्टींवर टॅक्स!
जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या उत्पन्नानुसार सरकारला टॅक्स द्यावा लागतो. जे गरजेचंही आहे आणि योग्यही. पण तेच जर तुम्हाला कुणी तुम्ही सिंगल आहात म्हणून टॅक्स द्या किंवा शरीरावर टॅटू काढायचा असेल टॅक्स द्या, तर तुमचं काय रिअॅक्शन असेल? हे काल्पनिक नाहीये. कारण अशाप्रकारच्या विचित्र गोष्टींवर काही देशांमध्ये टॅक्स द्यावा लागतो.
१) बॅचलर टॅक्स
(Source : tenplay)
युनायटेड स्टेटच्या Missouri मध्ये २१ वर्षाच्या व्यक्तीपासून ते ५० वर्षांच्या व्यक्तीला सिंगल राहिल्यास १ डॉलर टॅक्स द्यावा लागतो. हा टॅक्स पहिल्यांदा १८२० मध्ये लागू करण्यात आला होता. यासोबतच जर्मनी, इटली आणि साऊथ आफ्रिकासहीत अनेक देशांमध्ये बॅचलर टॅक्स वसूल केला जातो. म्हणजे इथे माणूस सुखाने सिंगलही राहू शकत नाही.
२) पेट टॅक्स
२०१७ मध्ये पंजाब सरकारने पाळीव प्राण्यांवर टॅक्स वसूल करण्याची घोषणा केली. हे टॅक्स दोन प्रकारचे असतात. पहिला जर एखादी व्यक्ती त्याच्या घरी कुत्रा, मांजर, हरिण किंवा बकऱ्या पाळतो तर त्याला टॅक्स म्हणून वर्षाला २५० रुपये द्यावे लागतात. तेच गाय, म्हैस, हत्ती, घोडा आणि ऊंट यांसाठी ५०० रुपये टॅक्स द्यावा लागतो.
३) ब्लूबेरी टॅक्स
अमेरिकेतील Maine मध्ये ब्लूबेरीचं सर्वात जास्त उत्पादन होतं. तेच जर कुणी दुसरं याचं उत्पादन केलं किंवा याचं झाड विकत घेतात किंवा खरेदी करतात त्यांना प्रति पाउंड दीड पेनी टॅक्स भरावा लागतो.
४) आइस ब्लॉकसाठी टॅक्स
जर तुम्ही Arizona गेलात तर इथे आइस ब्लॉक खरेदी करण्यापेक्षा आइस क्यूब खरेदी करणे फायद्याचे ठरेल. कारण इथे आइस ब्लॉक खरेदी करण्यावर टॅक्स भरावा लागतो.
५) भोपळ्यावर टॅक्स
भारतात भलेही भोपळ्याला फार मान दिला जात नसला तरी न्यू जर्सीमध्ये भोपळा खरेदी करण्यासाठी टॅक्स द्यावा लागतो.
६) विंडो टॅक्स
१८ व्या आणि १९व्या शतकात इंग्लंड, फ्रान्स, आयरलॅंड आणि स्कॉटलॅंडसारख्या देशांमध्ये विंडो टॅक्स देण्याची घोषणा केली होती. हा श्रीमंत लोकांसाठी एकप्रकारचा प्रॉपर्टी टॅक्स होता, जो त्यांच्या घरातील अनेक खिडक्यांवर लावला जात होता. पण नंतर याला विरोध झाल्याने हा टॅक्स रद्द करण्यात आला.
७) टॅटू काढण्यावर टॅक्स
अलिकडे तरुणाईमध्ये टॅटू काढण्याची चांगलीच क्रेझ बघायला मिळते. त्यासाठी अनेकजण मोठी किंमतही मोजतात. पण Arkansas मध्ये टॅटू काढण्यासाठी ६ टक्के सेल्स टॅक्स द्यावा लागतो.
८) टॉयलेट फ्लश टॅक्स
टॉयलेटमध्ये दिवसभर किती पाणी खर्च केलं जातं. हे माहिती करुन घेण्यासाठी Maryland सरकारने टॉयलेट फ्लशचा वापर करण्यावर प्रति महिना ५ डॉलर टॅक्स घेण्यास सुरुवात केली.