73 year old woman marriage advertisement response from 69 year old man | कर्नाटक : ७३ वर्षीय महिला स्वत:साठी शोधत आहे जोडीदार, ६९ वर्षीय व्यक्तीचा आला रिप्लाय!

कर्नाटक : ७३ वर्षीय महिला स्वत:साठी शोधत आहे जोडीदार, ६९ वर्षीय व्यक्तीचा आला रिप्लाय!

ते म्हणतात ना प्रेमाला वयाची सीमा नसते. याचं एक उदाहरण कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये बघायला मिळालं. येथील एका ७३ वर्षीय महिला शिक्षिकेने लग्नासाठी जाहिरात दिली आहे. त्यावर एका ६९ वर्षीय व्यक्तीने प्रतिक्रियाही दिली आहे. कर्नाटकातील म्हैसूरमधील महिलेने दिलेली ही जाहिरात चर्चेचा विषय ठरत आहे. या जाहिरातीत वयोवृद्ध महिलेने तिला एक वयस्कर जोडीदार हवा असल्याचे म्हटले आहे. 

७३ वर्षीय महिलेने जाहिरात देऊन सांगितले की, ती एकाकी जीवन जगत आहे आणि तिला जोडीदाराचा शोध आहे. बंगळुरूमधील महिलावादी कार्यकर्ता वृंद अदिगे यांनी इंडिया टुडेला सांगितले की,  ही एक चांगली गोष्ट आहे. यात वयाचं काही देणं-घेणं नाही. आपण सर्वांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. आपण वर्षानुवर्षे हाच विचार करत आलो आहोत की, युवावस्थेतच लग्न केलं पाहिजे. (हे पण वाचा : 'या' देशात महिलांना किडनॅप करून जबरदस्ती लग्न करण्याची विचित्र परंपरा, UNनेही व्यक्ती केली चिंता!)

मीडिया रिपोर्टनुसार, या जाहिरातीवर एका ६९ वर्षीय व्यक्तीने प्रतिक्रिया दिली आहे. ही व्यक्ती इंजिनिअर होती आणि आता रिटायर झाली आहे. पण या व्यक्तीबाबत अधिक माहिती समोर आली नाही. या महिलेने सांगितले की, तिला पारंपारिक पद्धतीने आपल्या पतीसोबत जीवन जगायचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा घटस्फोट झाला होता. हा अनुभव फारच भीतीदायक होता. त्यानंतर महिलेने अनेक वर्ष लग्न केलं नाही. आता तिने पुन्हा लग्न करण्याचा विचार केलाय. (हे पण वाचा : चमत्कारच! तीन आठवड्यांची गर्भवती महिला पुन्हा झाली गर्भवती, वाचा कसे जन्मले दोन्ही बाळ!)

ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लोकांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी महिलेच्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींना हा निर्णय रूचला नाही. दुसरीकडे लोक या महिलेला सावधान राहण्याचाही सल्ला देत आहे. 
 

Web Title: 73 year old woman marriage advertisement response from 69 year old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.