७ वर्षांचा मुलगा YouTube मुळे झाला कोट्यधीश, असं करतो तरी काय हा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 15:48 IST2019-10-22T15:42:26+5:302019-10-22T15:48:39+5:30
आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येकालाच आयुष्यात खूप मेहनत करावी लागते. कोट्यधीश होण्याचंही अनेकांचं स्वप्न असतं. पण असं कोट्यधीश होणं प्रत्येकाच्या नशीबात नसतं.

७ वर्षांचा मुलगा YouTube मुळे झाला कोट्यधीश, असं करतो तरी काय हा?
आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येकालाच आयुष्यात खूप मेहनत करावी लागते. कोट्यधीश होण्याचंही अनेकांचं स्वप्न असतं. पण असं कोट्यधीश होणं प्रत्येकाच्या नशीबात नसतं. पण फोर्ब्सनुसार एक ७ वर्षांचा लहान मुलगा त्याच्या मेहनतीने कोट्यधीश झालाय.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, केवळ ७ वर्षांचा मुलगा असं कोणतं काम करत असेल की, तो त्याच्या नेहनतीने आज कोट्यधीश झालाय. तर चला जाणून घेऊ काय करतो हा मुलगा. या ७ वर्षांच्या मुलाने खेळण्यांचे रिव्ह्यू करून आतापर्यंत १०० कोटी रूपये कमाई केली आहे.
फोर्ब्सने यूट्यूबवरून पैसे कमावणाऱ्यांची यादी जाहीर केली असून त्यात पहिलं स्थान रॉयन नावाच्या मुलाला दिलं आह. हा मुलगा खेळण्यांचे रिव्ह्यू करतो. त्याच्या यूट्यूब चॅनेलने यावर्षी सर्वात जास्त कमाई केली आहे.
रॉयन टॉइज रिव्ह्यू यूट्यूब चॅनलचा होस्ट ७ वर्षांचा रॉयनच आहे. हा मुलगा जगातल्या सर्वच खेळण्यांचा रिव्ह्यू लहान मुलांसाठी आणि त्यांच्या आई-वडिलांसाठी करतो. गेल्यावर्षी रॉयन या यादीत आठव्या स्थानावर होता. आता तो पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
रॉयनचं हे यूट्यूब चॅनल त्याच्या परिवारातील सदस्यांच्या देखरेखीखाली चालवतो. या चॅनलमधून त्याने जून २०१७ ते १ जून २०१८ दरम्यान २२ मिलियन डॉलर म्हणजेच २.२ कोटी रूपये कमाई केली आहे.