१०० वर्ष जुन्या खाणीत सापडला ४२५ कॅरेटचा दुर्मिळ हिरा, हे आहेत जगातले ५ मोठे हिरे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 16:31 IST2019-04-02T16:10:04+5:302019-04-02T16:31:00+5:30
ही तिच खाण आहे जिथे जगातला सर्वात मोठा हिरा काही वर्षांपूर्वी सापडला होता.

१०० वर्ष जुन्या खाणीत सापडला ४२५ कॅरेटचा दुर्मिळ हिरा, हे आहेत जगातले ५ मोठे हिरे!
दक्षिण आफ्रिकेत याआधीही बहुमूल्य आणि दुर्मिळ हिरे सापडले आहेत. पण यावेळी येतील प्रीमिअर खाणीतून ४२५ कॅरेटचा मोठा हिरा सापडला आहे. ही तिच खाण आहे जिथे जगातला सर्वात मोठा हिरा काही वर्षांपूर्वी सापडला होता. खाणीचा मालक पीटर म्हणाला की, आता इथे ४२५ कॅरेटचा हिरा सापडला आहे.
(Image Credit : www.mining.com)
असे सांगितले जात आहे की, ४२५ कॅरेटच्या या खास हिऱ्याची किंमत १५ मिलियन म्हणजेच साधारण १०३ कोटी रूपये असल्याचा अंदाज आहे. पीटरचं म्हणणं आहे की, गेल्या १६ वर्षातला हा सापडलेला सर्वात मोठा हिरा आहे. पीटर आणि त्याची कंपनी हा हिरा सापडल्यावर आनंद आहेत. कारण गेल्या काही वर्षांपासून या खाणीतून इतका मोठा आणि महागडा हिरा सापडला नाही.
दक्षिण आफ्रिकेतील ११७ वर्ष जुनी प्रीमिअर खाण १९०२ पासून सुरू आहे. १९०५ मध्ये या खाणीतून सर्वात मोठा हिरा कलिनन सापडला होता. हा हिरा ३, १०६ कॅरेटचा होता. पीटरने सांगितले की, नव्या हिऱ्याच्या शोधामुळे त्याच्या कंपनीचे शेअर ७.७ टक्क्यांनी वर गेले आहेत. दावा केला जात आहे की, हा हिरा १०३ कोटी रूपये ते २१५ कोटी रूपये दरम्यान विकला जाऊ शकतो.
जगातले ५ सर्वात मोठे हिरे
कलिनन डायमंड
३१०६ कॅरेटचा कलिनन हिरा १९०५ मध्ये साउथ आफ्रिकेतील खाणीत मिळाला होता. या हिऱ्याच्या नाव खाणीचा मालक सर थॉमस कलिनन यांच्यावर ठेवण्यात आलं होतं. ब्रिटनच्या राजाला गिफ्ट दिल्यानंतर हा हिरा दोन भागात तोडण्यात आला होता. यांना ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका आणि लेसर स्टार ऑफ आफ्रिका अशी नावे देण्यात आली होती. हे दोन्ही हिरे राजघराण्याच्या मुकूटांची शोभा वाढवत आहे.
लेसी ला रोना डायमंड
२०१५ मध्ये हा हिरा एक मजूराला कॅनडातील एका खाणीत मिळाला होता. या हिऱ्याचा आकार टेनिस बॉल इतका आहे. ग्रॅफ डायमंड ज्वेलरने हा हिरा जवळपास ५३ मिलियन डॉलर म्हणजेच ३०० कोटी रूपयांना खरेदी केला होता.
एक्सेलसीअर डायमंड
हा हिरा सुद्धा साऊथ आफ्रिकेच्या खाणीत सापडला होता. ९९५ कॅरेटचा हा हिरा नंतर २० तुकड्यांमध्ये तोडला गेला. त्यानंतर याच्या सर्वात मोठ्या ७० कॅरेटच्या तुकड्याला २.६ मिलियन डॉलरला म्हणजेच १६ कोटी रूपयांना विकलं.
स्टार ऑफ सिएरा लियोन
या हिऱ्याचं नाव साऊथ आफ्रिकेतील एक देश सिएरा लियोनच्या नावावर ठेवण्यात आलं. ९६९ कॅरेटचा हा हिरा याचं शहरात सापडला होता. हा हिरा १७ तुकड्यांमध्ये तोडण्यात आला. याचा सर्वात मोठा ५४ कॅरेटचा तुकडा विकला गेला.
दक्षिण आफ्रिकेच्या लेसोथो डोंगरातील हिरा
हा हिरा इतिहासातील पाचवा सर्वात मोठा हिरा आहे. ९१० कॅरेटचा हा हिरा दक्षिण आफ्रिकेच्या लेसोथो डोंगरात सापडला होता.