वडिलांचं पाचवं लग्न रोखल्यावर झाला गोंधळ, 4 पत्नी आणि 7 मुलांनी केली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 16:51 IST2022-09-05T16:49:18+5:302022-09-05T16:51:15+5:30
इथे एका व्यक्तीला एक-दोन नाही तर तब्बल चार-चार पत्नी असूनही तो पाचवं लग्न करण्याच्या तयारीत होता. पण ऐन लग्नावेळी जे घडलं ते फारच आश्चर्यकारक होतं.

वडिलांचं पाचवं लग्न रोखल्यावर झाला गोंधळ, 4 पत्नी आणि 7 मुलांनी केली पोलखोल
Cheating In Marriage सोशल मीडियावर नेहमीच काही विचित्र घटनांचे किस्से व्हायरल होत असतात. अशाच एका किस्स्याने सर्वांनाच हैराण केलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आहे. इथे एका व्यक्तीला एक-दोन नाही तर तब्बल चार-चार पत्नी असूनही तो पाचवं लग्न करण्याच्या तयारीत होता. पण ऐन लग्नावेळी जे घडलं ते फारच आश्चर्यकारक होतं.
55 वर्षीय व्यक्तीने केली फसवणूक
हे पूर्ण प्रकरण 55 वर्षीय शफी अहमदच्या अवतीभवती फिरत आहे. या व्यक्तीने असा काही कारनामा केला की, याचे घरातील लोक त्याच्यावर नाराज झाला आणि एकच गोंधळ उडाला. हे प्रकरण या व्यक्तीच्या पाचव्या लग्नासंबंधी आहे. या व्यक्तीच्या लग्न मंडपातच मोठा ड्रामा झाला.
अर्थातच असं काही केल्यावर कुणालाही राग येईल. शफी अहमदचं लग्न रोकण्यासाठी त्याच्या चार पत्नी त्यांच्या सात मुलांना घेऊन लग्न मंडपात पोहोचल्या. जशी या सर्वांनी नवरीला सत्य परिस्थिती सांगितली तेव्हा एकच गोंधळ उडाला. वाद इतका वाढला की, मारामारी झाली. इतकंच नाही तर नवरदेवाला बेदम मारहाण करण्यात आली.
हे सगळं झाल्यावर नवरदेव लग्न मंडपातून पळून गेला. त्यानंतर नवरदेवाच्या 7 मुलांनी पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. झालं असं होतं की, वडिलांनी मुलांना त्यांचा महिन्याचा खर्च देणंही बंद केलं होतं. त्यामुळे परिवाराला जशी त्याच्या पाचव्या लग्नाची माहिती मिळाली सगळेच्या सगळे संतापून लग्न मंडपात पोहोचले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.