'36 वर्षीय व्हर्जिन आहे, जोडीदार शोधतीये', या कारणामुळे होत नाहीये लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 15:04 IST2023-03-17T14:59:39+5:302023-03-17T15:04:12+5:30

या तरूणीचं नाव सोनाली आहे आणि ती अमेरिकेतच वाढली आहे. पार्ट टाइम स्टॅंडअप कॉमेडिअन सोनाली नुकतीच 39 वर्षीय कार्लोससोबत डेटवर गेली होती. दोघांमध्ये खूप बोलणं झालं, पण तरीही काही जमलं नाही.

36 year old virgin girl looking for life partner because of this marriage is not happening | '36 वर्षीय व्हर्जिन आहे, जोडीदार शोधतीये', या कारणामुळे होत नाहीये लग्न!

'36 वर्षीय व्हर्जिन आहे, जोडीदार शोधतीये', या कारणामुळे होत नाहीये लग्न!

36 वर्षीय भारतीय वंशाच्या एका तरूणीचं म्हणणं आहे की, तिचं वय कितीही झालं तरी ती तिच्या मूल्यांवर आणि अटींवरच रिलेशनशिप पुढे नेईल. ती म्हणाली की, ती आतापर्यंत व्हर्जिन आहे आणि आपल्यासाठी जोडीदाराचा शोध घेत आहे. यासाठी ती अनेक तरूणांसोबत ब्लाइंड डेटवरही गेली. पण त्यांना विश्वास बसला नाही की, तरूणीने लग्नाआधी सेक्स केला नसेल.

या तरूणीचं नाव सोनाली आहे आणि ती अमेरिकेतच वाढली आहे. पार्ट टाइम स्टॅंडअप कॉमेडिअन सोनाली नुकतीच 39 वर्षीय कार्लोससोबत डेटवर गेली होती. दोघांमध्ये खूप बोलणं झालं, पण तरीही काही जमलं नाही. कारण सोनालीला मुलगा पसंत नव्हता. 

न्यू जर्सीमध्ये राहणारी सोनाली म्हणाली की, तिला तिच्या स्वप्नातील राजकुमार शोधण्यात खूप अडचण येत आहे. तिच्यासाठी सेक्स एक पवित्र आणि खास कार्य आहे. त्यामुळे तिला ते करण्याआधी सगळी माहिती हवी आहे. सोनाली म्हणते की, ती अशीच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपलं शरीर सोपवणार नाही.

सोनाली म्हणते की, भारतात लग्नाआधी सेक्स अजूनही टॅबू आहे. माझे आई-वडील याबाबत कधी काही बोलले नाहीत. पदवी शिकत असताना ते अरेंज मॅरेजबाबत प्लान करत होते. मी अरेंज मॅरेजचा सन्मान करते, पण ते माझ्यासाठी नाहीये.

सोनाली म्हणाली की, मी 5 वर्ष वॉल स्ट्रीटमध्ये काम केलं. मुलं माझ्याकडे आकर्षित होत होते, पण मला वाटत होतं की, त्यांची ईच्छा केवळ मला बेडवर नेण्याचीच आहे. जर त्यांनी माझा वापर करून ते गायब झाले असते तर मला वाईट वाटलं असतं.

सोनाली पुढे म्हणाली की, तिने आतापर्यंत पाच लोकांना किस केलं आहे. पण कुणासोबत गोष्टी पुढे गेल्या नाहीत. कारण तिचे तत्व तिच्या आड येत होते. यादरम्यान ती अशा एका व्यक्तीला भेटली जो तिला पसंत होता. पण नंतर तिला कळालं की, त्याचाही जोर फिजिकल रिलेशनवरच होता. त्याला एक दिवस समजलं की, ती त्याच्यासोबत रिलेशन बनवू शकत नाही तर तो तिला सोडून गेला.

सोनाली सांगते की, मी माझ्या आयुष्यात ज्या 5-6 लोकांना डेट केलं, त्यांच्यासोबत रिलेशन पुढे गेलं नाही. काही माझा लूक पाहून कॉन्टॅक्ट करत होते, पण मी माझी तत्व सांगितल्यावर गायब होत होते. 

Web Title: 36 year old virgin girl looking for life partner because of this marriage is not happening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.