हजारो वर्ष जुन्या इमारतीत सुरू होतं खोदकाम, सापडलं एक मातीचं मडकं आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 01:57 PM2024-06-20T13:57:39+5:302024-06-20T13:58:48+5:30

एका जुन्या इमारतीमध्ये एक वेगळाच खजिना सापडला आहे. एका इमारतीमध्ये एक मातीचं मडकं सापडलं असून त्यात वाईन सापडली आहे.

2000 year old wine found in ancient roman tomb in Spain | हजारो वर्ष जुन्या इमारतीत सुरू होतं खोदकाम, सापडलं एक मातीचं मडकं आणि....

हजारो वर्ष जुन्या इमारतीत सुरू होतं खोदकाम, सापडलं एक मातीचं मडकं आणि....

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात कुठे ना कुठे खजिना सापडल्याच्या घटना समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका जुन्या इमारतीमध्ये एक वेगळाच खजिना सापडला आहे. एका इमारतीमध्ये एक मातीचं मडकं सापडलं असून त्यात वाईन सापडली आहे. ही वाईन जगातील सगळ्यात जुनी वाईन असल्याचा दावा केला जात आहे. ही वाईन २००० वर्ष जुनी असल्याचा दावा केला जात आहे. 

एका जुन्या मकबऱ्याचं खोदकाम करत असताना अचानक एक मातीचं मडकं सापडलं. जेव्हा याचं झाकणं उघडलं गेलं तेव्हा यात २ हजार वर्ष जुनी वाईन आढळून आली. जी अजूनही चांगल्या स्थितीत आहे.

गार्जियन वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, स्पेनच्या कार्मोना शहरात साधारण ५ वर्षाआधी एक प्राचीन रोमन मकबरा सापडला होता. हा मकबरा एका एडालूशियन भागात होता. येथे एका घराचं काम सुरू होतं तेव्हाच एक मकबरा लोकांसमोर आला. ज्यानंतर तपास सुरू झाला. जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्सने या शोधाबाबत सांगण्यात आलं होतं. आता समोर आलं की, यात सापडलेल्या मातीच्या मडक्यामध्ये तरल पदार्थ होता. ही त्यावेळची लोकल वाईन होती. ही जगातील सगळ्यात जुनी वाईन मानली जात आहे.

या शोधाआधी १८६७ मध्ये जर्मनीतील एक शहर स्पेयरमध्ये एक रोमन मकबरा सापडला होता. ज्यात एक वाईनची बॉटल मिळाली होती. ही वाईन सगळ्यात जुनी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण या वाईनचा रंग आता भुरका लाल झाला आहे. कारण यात केमिकल रिअॅक्शन झालं आहे. 

वैज्ञानिकही झाले हैराण

वाईनच्या या मडक्यामध्ये एक सोन्याची अंगठी सापडली आहे. आर्कियोलॉजिस्ट को-ऑथर हुआन मॅनुएल रोमन म्हणाले की, जेव्हा त्यांना ही मडकी सापडली तेव्हा त्यांना वाटलं की, हा केवळ एक मकबरा असेल. त्यात काही वस्तू असतील. पण त्यांनी कल्पनाही केली नव्हती की, त्यांना यात वाईन मिळेल. 

रिपोर्टनुसार प्राचीन रोमन संस्कृतीमध्ये मृत्यूनंतर लोकांना दफन केल्यावर वाईनचा खूप वापर होत होता. त्याचं असं मत होतं की, दारू मरण पावलेल्या व्यक्तीला पुढच्या जीवनात जाण्यास मदत करते.

Web Title: 2000 year old wine found in ancient roman tomb in Spain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.