बाबो! टॅक्सी बुक केली अन् 'ती' ड्रायव्हरच्याच प्रेमात पडली; खर्च केले तब्बल 2 लाख, झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 13:03 IST2022-12-20T13:00:14+5:302022-12-20T13:03:50+5:30

इमोजेन निकोल्सन असं 19 वर्षीय तरुणीचं नाव असून ती ब्रिटनची रहिवासी आहे. या मुलीला तिच्या आजोबांच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं, त्यासाठी तिने लंडन ते डरहम अशी उबेर कॅब बुक केली.

19 year old rich girl friendship with taxi driver spent 2 lakhs rs on journey | बाबो! टॅक्सी बुक केली अन् 'ती' ड्रायव्हरच्याच प्रेमात पडली; खर्च केले तब्बल 2 लाख, झालं असं काही...

फोटो - आजतक

एका 19 वर्षीय मुलीने बर्थ डे पार्टीला जाण्यासाठी उबेरची टॅक्सी बुक केली होती पण वाटेत तिने ड्रायव्हरशी मैत्री केली आणि त्याच्यासोबत फिरत राहिली. मुलीने ड्रायव्हरसोबत तब्बल 7 तास म्हणजेच 430 किमीचा प्रवास केला. स्वत: मुलीने तिच्या प्रवासाबद्दल लोकांना सांगितलं आहे की तिने 2 लाख रुपये खर्च करून आयुष्यभराची मैत्री मिळवली आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, इमोजेन निकोल्सन असं 19 वर्षीय तरुणीचं नाव असून ती ब्रिटनची रहिवासी आहे. या मुलीला तिच्या आजोबांच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं, त्यासाठी तिने लंडन ते डरहम अशी उबेर कॅब बुक केली. या प्रवासासाठी अनेक वाहनचालकांनी तिला नकार दिला होता, मात्र अखेर तिला 52 हजार 848 रुपयांमध्ये एक कॅब मिळाली. 

प्रवासादरम्यान, इमोजेनला ड्रायव्हर आवडला आणि ती त्याच्यासोबत डरहममध्ये अनेक ठिकाणी फिरायला गेली. या संपूर्ण प्रवासासाठी मुलीला 2 लाख रुपयांचे बिल भरावे लागले, ज्याचे स्क्रीनशॉट तिने शेअर केले आहेत. इमोजेनने सांगितलं की तिचं तिच्या आजोबांवर खूप प्रेम आहे, म्हणून तिने त्यांच्या वाढदिवसाला जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेतली. 

वाटेत तिला एवढा चांगला मित्र आणि टॅक्सी ड्रायव्हर मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. संपूर्ण 7 तासांच्या प्रवासात तिने ड्रायव्हरशी खूप गप्पा मारल्या. कॉफी प्यायली, सँडविच आणि केकही एकत्र खाल्ले. यात त्यांची मैत्री इतकी खास झाली की तरुणीला हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 19 year old rich girl friendship with taxi driver spent 2 lakhs rs on journey