बॉयफ्रेंडने स्पर्शही केला नव्हता तरी १७ वर्षीय झाली प्रेग्नेंट, प्रेग्नेसी किट पाहताच हादरली आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:18 IST2022-02-18T17:12:34+5:302022-02-18T17:18:07+5:30

एका महिलेने आपल्या किशोरवयातील असाच एक किस्सा सांगितला आहे. सोशल मीडियावर तिने याबाबत सांगितलं आहे.

17 year virgin girl gets pregnant without sex mother shocked after seeing pregnancy kit | बॉयफ्रेंडने स्पर्शही केला नव्हता तरी १७ वर्षीय झाली प्रेग्नेंट, प्रेग्नेसी किट पाहताच हादरली आई

बॉयफ्रेंडने स्पर्शही केला नव्हता तरी १७ वर्षीय झाली प्रेग्नेंट, प्रेग्नेसी किट पाहताच हादरली आई

 एखाद्या पुरुषासोबत शारीरिक संबंध येतो तेव्हाच एखादी महिला प्रेग्नंट होते किंवा आता आयव्हीएफमार्फत महिला प्रेग्नंट होतात. पण एखादी महिला या दोन्हीपैकी काहीच न करता प्रेग्नंट झाली असं सांगितलं तर आश्चर्यच वाटेल (Pregnancy Without Sex). एका महिलेने आपल्या किशोरवयातील असाच एक किस्सा सांगितला आहे. सोशल मीडियावर तिने याबाबत सांगितलं आहे.

कॅटी असं या महिलेचं नाव आहे.  कॅटी १७ वर्षांची होती तेव्हा शाळेत एका मुलाला ती डेट करत होती. दोघांमध्ये कधीच सेक्स नव्हता पण एकदा तिला पीरियड्स आले नाहीत. त्यामुळे आपण प्रेग्नंट तर नााही ना असं तिला वाटलं. कॅटीला हे समजण्याआधीच त्या दोघांचा ब्रेकअपही झाला होता. त्यामुळे आपली ही समस्या ती त्या मुलासोबतही शेअर करू शकली नाही. तिने मेडिकल स्टोरमधून प्रेग्नन्सी किट आणलं आणि टेस्ट केली. त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आणि कॅटीला धक्काच बसला.

बॉयफ्रेंडसोबत काहीच न करताही आपण प्रेग्नंट झालो, यामुळे कॅटी हैराण झाली. आता आपण सिंगल मदर होऊ असा निर्णय घेऊन तिने आपल्या आईला याबाबत सांगितलं. कॅटीच्या आईला आधी ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत असलेल्या नात्याबाबत काही लपवत असल्याचंव वाटलं. पण कॅटी आपल्यात तसं काहीच झालं नाही, तरी आपण प्रेग्नंट झालो असं वारंवार सांगत होती. त्यावेळी तिच्या आईने तिने टेस्ट केलेली प्रेग्नन्सी किट आणायला सांगितलं. किट पाहताच तिच्या आईने डोक्याला हात लावला.

कॅटी ज्या किटवर दोन लाइन पाहून स्वतःला प्रेग्नंट समजत होती ते ओव्ह्युलशन टेस्ट किट होती. मुलीचा ओव्ह्युलेशन पीरिअड कधी आहे, या किटमुळे समजतं. यानंतर काही दिवसांतच कॅटीची मासिक पाळीही आली. कॅटी आता २७ वर्षांची आहे, तिचं लग्न झालं आहे आणि तिला एक मुलगीही आहे. कॅटीचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. बहुतेक लोकांनी सेक्स एज्युकेशनची गरज असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: 17 year virgin girl gets pregnant without sex mother shocked after seeing pregnancy kit