सिंगापूर भलेही छोटा देश आहे, पण येथील लाइफस्टाईल, नाइटलाइफ, खाद्य पदार्थ आणि निसर्ग या गोष्टी या देशाला खास बनवतात. हा देश वेगवेगळ्या संस्कृती, भाषा आणि अनुभवांचा देश आहे. सिंगापूर हा देश जगभरात स्वच्छतेसाठी आणि च्युइंगम बॅनसाठीही ओळखला जातो. त्याशिवायही येथील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वाचून तुम्ही थक्क व्हाल.

१) पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सोबत बोर्ड ठेवणे

(Image Credit : www.straitstimes.com)

कोणत्याही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवासादरम्यान काही लोकांना झोप येते. त्यामुळे त्यांना उतरायचं त्या ठिकाणाहून ते पुढे निघून जातात. पण इथे एक फारच अजब आयडिया काढली आहे. प्रवासादरम्यान एक बोर्ड ठेवला जातो, जेणेकरून त्यांचा स्टॉप आल्यावर त्यांना उठवलं जावं.

२) आइस्क्रीम सॅंडविच

(Image Credit : www.singaporetravellers.info)

सिंगापूरचा जगप्रसिद्ध आइस्क्रीम सॅंडविच हा पदार्थ ब्रेड स्लाइसच्या मधे आइस्क्रीम ठेवून तयार केला जातो. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आइस्क्रीम फ्लेवर घेऊ शकता.

३) रस्त्यावर फिरणारे Otters प्राणी

(Image Credit : youtube.com)

सिंगापूरच्या रस्त्यावर तुम्ही जंगली Otters फिरतानाही पाहू शकता. हे पर्यटकांसाठी आणि स्थानिक लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. गेल्या काही वर्षात यांची संख्याही फार वाढली आहे.

४) प्लास्टिक बॅगमध्ये कॉफी

(Image Credit : orangefoamfinger.wordpress.com)

कॉफी तर सगळ्याच ठिकाणी मिळते. आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कॉफी मगमध्ये टाकून घेतली असेल. तर तुम्हाला सिंगापूरची कॉफी प्यायची असेल तर मगमध्ये नाही तर प्लास्टिक बॅगमधून प्यावी लागेल. इथे कॉफीला कॉफी नाही तर कोपी म्हणतात.

५) प्रॅक्टिकल क्रिएटिव्हिटी

(Image Credit : soranews24.com)

हे Spike Away जॅकेट लोकांसाठी सोशल प्लेसेस लोकांपासून बचावासाठी तयार करण्यात आले होते. हे घातल्यावर कुणीही तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही.  

६)  Mashed Potato Vending Machine

(Image Credit : www.finedininglovers.com)

मॅश केलेल्या बटाट्यांची वेंडींग मशीन लोकांमध्ये आकर्षणाचं केंद्र आहे. सिंगापूरमध्ये अनेक दुकानांमध्ये ही वेंडींग मशीन लावण्यात आली आहे. 

७) अजब Road Signs

(Image Credit : brightside.me)

सिंगापूरच्या रस्त्यांवर तुम्हाला वेगवेगळे रोड साइन बघायला मिळतील. पण हे समजायला कठीण आहेत. 

८) रिअल लाइफ सुपरहिरो

(Image Credit : www.bbc.com)

तुम्ही सिनेमात अनेक सुपरहिरो पाहिले असतील. पण इथे एका मुलाच्या आयडी कार्डवरील नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. याचं कार्ड इंटरनेटवर व्हायरल झालं होतं. पण या तरूणाला एका चोरीप्रकरणी २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती.

९) ड्रिंक्सची अजब नावे

(Image Credit : pinterest.com)

कुणाला जर काय खाणार असं विचारलं तर काहीही आण, जे असेल ते असं ऐकायला मिळतं. सिंगापूरमध्ये २००७ ते २०१० पर्यंत खरंच 'काहीही' आणि 'जे असेल ते' मिळत होतं. इथे दोन ड्रिंक्सचं नाव 'Anything' आणि 'Whatever' अशी होती.

१०) फिश केक

(Image Credit : coconuts.co)

सिंगापूरच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यावर तेथील खाण्याच्या पदार्थांना ब्रॅन्डेड करण्यात आलं. यावेळी जी सर्वात नवीन पदार्थ होता तो होता फिश केक. आज फिश केक सिंगापूरची फेमस डिश आहे.

११) सार्वजनिक माफी मागणे

(Image Credit : buzzfeed.com)

सिंगापूरमध्ये माफी मागण्यासाठी न्यूज पेपरमध्ये नोटीस दिली जाते. या माध्यमातून लोक माफी मागतात.

१२) टेबलावर टिशू पॅकेट

(Image Credit : newnation.sg)

सिंगापूरच्या गर्दी असलेल्या हॉकर सेंटरमध्ये सीट मिळवणं फारच कठीण काम असतं. त्यामुळे लोकांना इथे सीट मिळण्यासाठी टेबलवर काहीतरी ठेवावं लागतं. यासाठी टेबलवर टिशूचं पॅकेट वापरलं जातं. आपल्याकडे एसटीमध्ये तसा रूमाल ठेवला जातो.

Web Title: 12 unusual things that can only be found in Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.