२३ रोजी जि.प.सभापतींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 21:32 IST2019-12-11T21:32:38+5:302019-12-11T21:32:48+5:30

जळगाव - जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बुधवारी जिल्हा परिषद सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात ...

 ZP presidential election on 7th | २३ रोजी जि.प.सभापतींची निवड

२३ रोजी जि.प.सभापतींची निवड

जळगाव- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बुधवारी जिल्हा परिषद सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे़ २३ डिसेंबर रोजी ही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे़

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे यंदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला राखीव निघाले असल्याने सलग तिसऱ्यांदा महिला राज असणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाले असून २१ डिसेंबर रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणार आहे. मंगळवारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. दरम्यान, बुधवारी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी २३ डिसेंबर रोजी विषय समिती सभापतींची निवड होणार आहे. पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांनी याबाबतचे आदेश बुधवारी जारी केले. २३ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सभापती पदासाठी अर्ज प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात सभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title:  ZP presidential election on 7th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.