शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीची सेनेला हाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 00:51 IST

काँग्रेसची आज गटनोंदणी : भाजपेतर पक्ष एकवटले

जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक एका दिवसावर येऊन ठेपली असताना भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे. शिवसेनेच्या सोमवारच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत अंतिम निर्णय होईल. तर काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी गटनोंदणीसाठी जि.प. सदस्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड मंगळवार, २१ रोजी होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रस्ताव दिला आहे. भाजपा युतीबाबत काहीच बोलायला तयार नसल्याने शिवसेनेनेदेखील राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू केल्याचे  गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जि.प.सदस्य गटनोंदणीला वारंवार गैरहजर राहणाºया किनगाव-डांभुर्णी गटाच्या जि.प.सदस्या अरुणा रामदास पाटील यांच्यासह चारही सदस्यांना सोमवारी होणाºया गटनोंदणीसाठी उपस्थित रहावे या आशयाची कायदेशीर नोटीस काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी काढली आहे. अरुणा पाटील यांनी यापूर्वी दिलेली नोटीस न स्वीकारल्याने त्यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली आहे. काँगे्रसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक होत आहे. या बैठकीत जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीतील काँग्रेसच्या भूमिकेबाबत निर्णय होणार आहे. राष्टÑवादीला कुणी पाठिंबा दिला अथवा नाही दिला तरी राष्टÑवादी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहे.