आरटीओ अधिका-यांशी तरुणाची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 21:27 IST2020-08-24T21:12:43+5:302020-08-24T21:27:59+5:30

जळगाव : आरटीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता मयुर श्याम जोशी (रा.पहूर कसबे, ता.जामनेर) या तरुणाने ...

The youth's quarrel with the RTO officials | आरटीओ अधिका-यांशी तरुणाची अरेरावी

आरटीओ अधिका-यांशी तरुणाची अरेरावी

जळगाव : आरटीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता मयुर श्याम जोशी (रा.पहूर कसबे, ता.जामनेर) या तरुणाने मोटार वाहन निरीक्षकांशी अरेरावीची भाषा वापरुन महिला निरीक्षकाला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी जोशी याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्याकाळी जोशी याला अटक करण्यात आली.
सहायक मोटार वाहन निरीक्षक पांडूरंग बबन आव्हाड (रा.श्रध्दा कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरटीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाजवळ सोमवारी सकाळी निखील अशोक गायकवाड, मोरेश्वर शिवाजी साखरे, गणेश उत्तम लव्हाटे, दीपक एकनाथ ढाकणे, श्रध्दा ज्ञानेश्वर महाजन, दीपक सुखदेव साळुंखे व प्रियंका प्रवीण पाटील आदी सहायक मोटार वाहन निरीक्षक यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेट कंट्रोल ड्युटी लावण्यात आली होती. ११.४० वाजता आव्हाड बाहेरुन कार्यालयात आले असता मयुर जोशी हा प्रवेशद्वाराजवळ जोरजोरात आरडाओरड करुन अधिकाºयांना शिवीगाळ करीत होता. तुम्ही लोकांची मुद्दाम अडवणूक करतात, काम करण्यास परावृत्त करीत आहात असे बोलून लोकांना भडकाविण्याचे काम करीत होता, असे तक्रारीत नमूद आहे.
*यापूर्वीही गुन्हे दाखल*
यावेळी अनेकांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला असता तो अधिकाºयांशी अर्वाच्च भाषा वापरत होता. यावेळी शेकडो लोक जमले होते. महिला अधिकाºयांशी अरेरावीने करुन शिवीगाळ केली. या प्रकारामुळे सर्व निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन शासकीय कामात अडथळा व राष्टÑीय साथ रोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मयुर जोशी हा यापूर्वी आरटीओ कार्यालयात एजंटचे काम करायचा.यापूर्वीही त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे.

Web Title: The youth's quarrel with the RTO officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.