पोलिसात तक्रार दिल्याने तरुणाला दांडक्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:02+5:302021-06-11T04:13:02+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सोंगडा चव्हाण या तरुणाने पुण्याचे मुकादम जयराम हरी राठोड यांच्या विरोधात जुन्या वादाच्या कारणावरून पोलिसात ...

The youth was beaten with a stick after lodging a complaint with the police | पोलिसात तक्रार दिल्याने तरुणाला दांडक्याने मारहाण

पोलिसात तक्रार दिल्याने तरुणाला दांडक्याने मारहाण

Next

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सोंगडा चव्हाण या तरुणाने पुण्याचे मुकादम जयराम हरी राठोड यांच्या विरोधात जुन्या वादाच्या कारणावरून पोलिसात तक्रार दिली होती. याचा रा. येऊन जयराम राठोड यांनी ५ जून रोजी रात्री १० वाजता चव्हाण यांना अडवून पोलिसात का गेला होता? असे बोलून श्याम हरी राठोड, विनोद ममराज राठोड, जानकीराम खिमा राठोड आणि दादू ममराज राठोड (सर्व रा. धानवड) यांनी लाकडाने व लाथा-बुक्क्‍यांनी बेदम मारहाण केली. यात ज्ञानेश्वर चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली आहे. वैद्यकीय उपचारानंतर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी गुरुवारी फिर्यादी दिली. त्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गफ्फार तडवी करीत आहेत.

Web Title: The youth was beaten with a stick after lodging a complaint with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.