अपघातात युवक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:14 IST2018-07-22T00:14:07+5:302018-07-22T00:14:22+5:30
अंबड तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णानगर वस्तीवरील धनंजय सदाशिव गाढे (वय २३) हा तरूण अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यात काम करत होता.

अपघातात युवक जागीच ठार
अंकुशनगर : अंबड तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णानगर वस्तीवरील धनंजय सदाशिव गाढे (वय २३)
हा तरूण अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यात काम करत होता.
शनिवारी दुपारी घरी जाण्यासाठी अंकुशनगरकडून दुचाकी (एम.एच.२१,बी.ई.६९४९) वरुन कृष्णानगर कडे जात असताना वडीगोद्रीहून शहागडकडे जाणारी पिकअप अॅपेरीक्षा गाडी (एम.एच.२१ एक्स.५५८२) ची जोरात धडक लागल्याने डोक्याला मार लागून जागीच ठार झाला.
अपघातानंतर पिकअप चालक फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे स. पो. अनिल परजणे, एन. एम. सय्यद, लकस यांनी भेट देऊन पंचनामा केला.