युवकांनी कमविले, प्रशासनाने गमविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 07:22 PM2018-12-07T19:22:00+5:302018-12-07T19:22:24+5:30

देशभरातील सैन्य भरतींचे रेकार्ड जळगावने तोडले

Youth earned, the administration lost | युवकांनी कमविले, प्रशासनाने गमविले

युवकांनी कमविले, प्रशासनाने गमविले

Next

सचिन देव
जळगाव : जळगाव येथे झालेल्या सैन्य भरतीसाठी तब्बल ६८ हजार मुलांनी हजेरी लावल्याने, देशभरातील सैन्य भरतींचे रेकार्ड जळगावने तोडले आहेत. एकीकडे युवकांनी जळगावचे नाव कमविले असताना, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने भरतीसाठी आलेल्या युवकांची सोय न केल्याने, नाव गमविले आहे.
या भरतीसाठी विविध जिल्ह्यांमधुन दररोज ५ ते ६ हजार युवक जळगावला येत असतांना, जिल्हा प्रशासनाने भरतीच्या ठिकाणापासुन तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या सैनिकी हॉलमध्ये निवाऱ्याची व्यवस्था केली. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठीच २० रुपये लागत असल्याने, बहुतांश तरुणांनी याकडे पाठ फिरवली होती. तर शिवतीर्थ निवाºयाच्या नावाखाली फक्त मंडप उभारला होता. या ठिकाणी शौचालयाची ना लाईटची व्यवस्था असल्यामुळे, तरुणांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. कुठल्याही ठिकाणी फिरते शौचालय नसल्याने, तरुणांना बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशनचा आश्रय घ्यावा लागला.
शिवतीर्थ मैदानावर झोपण्यासाठी उघड्यावरच मंडप उभारला असल्याने, तरुणांनी या ठिकाणी न झोपता परिसरातील व्यापारी संकुलाचे ओटे, बस स्टॅण्ड, गांधी उद्यानाचे फुटपाथ तर काही युवकांनी रस्त्यावर झोपुनही रात्र काढली. परभणी, नांदेड,औरंगाबाद, नंदुरबार या भागातुन आलेल्या हजारो युवकासांठी मनपा ना जिल्हा प्रशासनाने शौचालयाचीदेखील व्यवस्था न केल्याने, तरुणांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मुलांच्या सुविधेबाबात एकमेकांकडे बोट दाखवुन अधिकाºयांनी वेळ मारुन नेली. मात्र, कुठल्याही अधिकाºयाने पुढे येऊन, मुलांच्या गैरसोयीबद्दल मुलांशी चर्चादेखील केली नाही.
युवकांचे निवाºयासोबत खाण्या-पिण्याचेही हाल झाले. शहरात ढीगभर सामाजिक संस्था असताना कुठल्याही संस्थेने अन्नादानाची सुविधा केली नाही. यामुळे बाहेरुन आलेल्या हजारो युवकांना दुप्पटचे पैसे मोजुन पोटाची भूख भागवावी लागली. बस स्टॅण्डसमोरील व्यावसायिकांनी तर अक्षरश: युवकांना लुटण्याचे धंदे केले. यामुळे बेरोजगार तरुणांच्या खिशांना चांगलीच झळ बसली.
एकंदरीत पाहता भरतीसाठी आलेल्या तरुणासांठी जिल्हा प्रशासनाने कुठलिही सुविधा न केल्यामुळे तरुणांनी प्रशासनाविरोधात तीव्र संपातदेखील व्यक्त केला. शौचालय नसल्याने उघड्यावरच प्रात:विधी करावा लागला. यामुळे क्रीडा संकुल, शिवतीर्थ मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. यामुळे याचा परिणाम जळगावकरांच्या आरोग्यावरदेखील झाला. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जळगावकरांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली. भरतीसाठी आलेल्या उच्चशिक्षित तरुणांनी, त्यांना झालेल्या त्रासाबद्दल प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केल्याने, प्रशासनाने आपले नाव गमविले आहे. असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही.

Web Title: Youth earned, the administration lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव