अतिमद्यसेवनामुळे कुसुंबा येथील तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:50 IST2020-01-13T22:50:09+5:302020-01-13T22:50:41+5:30

जळगाव - कुसूंबा येथील तरूणाचा अतिमद्यसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. शरद नाना पाटील (३३, रा़ गणपतीनगर, कुसूंबा) ...

  Youth dies in Kusumba due to alcohol abuse | अतिमद्यसेवनामुळे कुसुंबा येथील तरूणाचा मृत्यू

अतिमद्यसेवनामुळे कुसुंबा येथील तरूणाचा मृत्यू

जळगाव- कुसूंबा येथील तरूणाचा अतिमद्यसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. शरद नाना पाटील (३३, रा़ गणपतीनगर, कुसूंबा) असे मयत तरूणाचे नाव आहे़

कुसूंबा येथील रहिवासी शरद पाटील हा एमआयडीसीतील एका पाईप कंपनीत आॅपरेटर म्हणून काम करीत होता़ त्याला सहा महिन्यांपासून दारूचे व्यसन जडले होत. रविवारी सकाळी ९ वाजता कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने पत्नी मनिषा आणि नातेवाईकांनी शोधाशोध केल्यावरही शरद हा आढळला नाही़ मात्र, सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील एका चहाच्या टपरीजवळ तो मृतावस्थेत आढळून आला़ नंतर नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात त्यास दाखल केले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले़ नंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़ शरद याच्या पश्चात पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई- वडील असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Web Title:   Youth dies in Kusumba due to alcohol abuse