धावत्या रेल्वेखाली आल्याने तरूणाचा मृत्यू; जळगावमधील घटना
By सागर दुबे | Updated: April 13, 2023 14:10 IST2023-04-13T14:10:31+5:302023-04-13T14:10:59+5:30
या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धावत्या रेल्वेखाली आल्याने तरूणाचा मृत्यू; जळगावमधील घटना
जळगाव : भादली-जळगाव दरम्यानात धावत्या रेल्वेखाली येऊन अनोळखी ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून अद्याप तरूणाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भादली ते जळगाव दरम्यानातील अप-रेल्वेालाईनवरील खांबा क्रमांक ४२१/१२-१० जवळ बुधवारी सायंकाळी अनोळखी ३० वर्षीय तरूण हा धावत्या रेल्वेखाली येवून मयत झाला. ही घटना लोको पायलट गिरिष तांबे यांनी शनिपेठ पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिस कर्मचारी परिष जाधव यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मयताची ओळख पटविण्यासाठी जाधव यांनी प्रयत्न केले. मयत तरूणाची झडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळ ओळख पटेल असे काहीही मिळून आले नाही. अखेर शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांना ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.