शिरसोली येथे तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 20:50 IST2020-12-24T20:50:39+5:302020-12-24T20:50:51+5:30
जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथे सुभाष सुकलाल मराठे (वय २५,रा. इंदीरा नगर) या तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेवून ...

शिरसोली येथे तरूणाची आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथे सुभाष सुकलाल मराठे (वय २५,रा. इंदीरा नगर) या तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ .३० वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
सुभाष मराठे हा आई-वडीलांसह राहत होता. जळगाव शहरात बांधकाम मजूरीचे काम करीत होता. गुरूवारी आई व वडील घरात नसतांना सुभाष मराठे याने छताला साडीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. मयत तरूणाच्या पश्चात आई सुमनबाई, वडील सुकलाल भानूदास मराठे आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास हवालदार राजेंद्र ठाकरे, शुध्दोधन ढवळे करीत आहे.