शिंदी फाट्यानजीक अपघातात तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 22:08 IST2020-12-17T22:07:45+5:302020-12-17T22:08:16+5:30

फलकावर दुचाकी जाऊन आदळल्याने जखमी झालेल्या स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Young man killed in accident near Shindi Fateh | शिंदी फाट्यानजीक अपघातात तरुणाचा मृत्यू

शिंदी फाट्यानजीक अपघातात तरुणाचा मृत्यू

ठळक मुद्देउपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : तालुक्यातील हनुमंतखेडे येथील २६ वर्षीय तरुण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बोर्डाला धडकल्याने गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.
दिनांक १६ रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या  सुमारास अमोल शिवाजी पाटील (हनुमंत खेडे, ता. पारोळा) हा चाळीसगावकडून पारोळाकडे मोटरसायकल (एमएच१९-४६३३)वर जात असताना शिंदी फाट्याजवळ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलकावर आढळल्याने गंभीर जखमी झाले.
याबाबत त्याला लगेच पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.  अधिक तपास पोलिस करत 
आहेत.

Web Title: Young man killed in accident near Shindi Fateh