वडलीत तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:18 IST2019-11-20T22:17:50+5:302019-11-20T22:18:17+5:30
जळगाव : तालुक्यातील वडली येथे दिलीप गोविंदा पाटील (४०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ...

वडलीत तरुणाची आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील वडली येथे दिलीप गोविंदा पाटील (४०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. बीट अमलदार शिवाजी चौधरी, शशी पाटील व सचिन पाटील यांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना केला. पाटील हा मजुरी करायचा. त्याच्या पश्चात आई हिरकणबाई, पत्नी धनश्री, मुलगा सिध्देश, मुलगी जान्हवी व दोन भाऊ असा परिवार आहे.