शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

योग दिनाचा सर्वत्र अपूर्व उत्साह

By admin | Updated: June 21, 2017 14:41 IST

जागतिक योग दिन शहरात अपूर्व उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. शाळा, विद्यालये, विविध संस्थांतर्फे सकाळी योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.21- जागतिक योग दिन शहरात अपूर्व उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.  शाळा, विद्यालये, विविध संस्थांतर्फे सकाळी योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.  जिल्हा क्रीडा संकुल,काव्यरत्नावली चौकात शेकडो, अबाल, वृद्ध या कार्यक्रमात सहभागी झाले. यंदा जळगावकरांचा उत्स्फूर्त सहभाग दिसला. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. यातच शहर योगमय झाल्याची अनुभूती येत होती. 
जळगावातील काव्यरत्नावली चौकात सकाळी 6 वाजता प्रजापिता ब्रrाकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे सामुदायिक योगाभ्यास घेण्यात आला. युवाशक्ती फाउंडेशनतर्फे योगशिक्षिका हेतल पिंपरिया यांनी काव्यरत्नावली चौकात सकाळी 6.45 वाजता योगाबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती व भारत स्वाभीमान न्याय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात सकाळी 7 वाजता योगदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. आरोग्य भारती व जाणता राजा प्रतिष्ठान यांच्यातर्फे सकाळी 7 वाजता काव्यरत्नावली चौकात योगाभ्यास घेण्यात आला.
गोदावरील फाउंडेशन
जागतिक योग दिनानिमीत्त गोदावरी फाऊंडेशनच्या जळगाव सीबीएसई स्कुल, वैद्यकीय महाविद्यालय, भुसावळ आणि सावदा सीबीएसई स्कुल, गोदावरी नसिर्ंग महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील फिजीओथेरेपी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषी आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, होमीओपॅथी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय याठिकाणी योग-शिबीर घेण्यात आले.
भुसावळ परिसर
जागतिक योग दिन भुसावळ शहरासह परीसरात उत्साहाने साजरा झाला. भुसावळ रेल्वे विभागातर्फे रेल्वे क्रीडांगणावर योगासने करण्यात   डीआरएम आर.के.यादव यांच्यासह एडीआरएम अरुण धार्णिक व विभागीय अधिकारी सहभागी झाले होते. पोलीस ऑफीसर विश्रामगृहातील मैदानावर योगासने करण्यात आली. यात सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस निरीक्षक वसंत मोरे,  चंद्रकांत सरोदे व पोलीस अधिकारी,कर्मचारी सहभागी झाले होते.