शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

यंदा प्रथमच हतनूर धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी सात वाजता धरणाचे १६ दरवाजे पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी सात वाजता धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आला असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा प्रथमच धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून पुढील २४ तासात पाण्याचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हतनूर धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. त्यात रविवारी संध्याकाळीदेखील चांगला पाऊस झाला. यात सरासरी ३६.८ मि.मी. पाऊस झाला असला तरी यात एकट्या चिखलदरा येथे १०३ मि.मी. पाऊस झाल्याने पावसाचे हे पाणी पूर्णा नदीद्वारे धरणात पोहचत आहे. यात रविवारी मध्यरात्रीपासूनच धरणात पाण्याची आवक वाढली असून पाटबंधारे विभागाचे अधिकारी धरणावर लक्ष ठेवून आहेत.

यामध्ये १२ जुलै रोजी सकाळी सात वाजता धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. तापी नदीपात्रात ४५ हजार ८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले. पुढील २४ तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाच्या खालील गावात नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये गुरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.