मुक्ताईनगरात महिला शिवसैनिकांनी प्रशासनाला दिल्या बांगड्यांचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:51 IST2018-11-01T00:50:13+5:302018-11-01T00:51:07+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील रेशन कार्डात इतर जिल्ह्यातील आधार लिंकचा झालेला घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर थेट रेशन कार्डावर धान्य वितरीत करावे या मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलेल्या शिवसेना महिला आघाडीतर्फे मंगळवारी तहसील कार्यालयात बांगड्यांची भेट दिली

मुक्ताईनगरात महिला शिवसैनिकांनी प्रशासनाला दिल्या बांगड्यांचा आहेर
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील रेशन कार्डात इतर जिल्ह्यातील आधार लिंकचा झालेला घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर थेट रेशन कार्डावर धान्य वितरीत करावे या मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलेल्या शिवसेना महिला आघाडीतर्फे मंगळवारी तहसील कार्यालयात बांगड्यांची भेट दिली व निदर्शने करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील परिसरात घोषणा दिल्या.
या महिलांनी अगोदर रेशनकार्ड आधार लिंक घोळाबाबत तहसिल आवारात बांगड्या फेको आंदोलनचे निवेदन दिले होते. मात्र प्रशासनावर कोणताही परिणाम न झाल्यामुळे सौभाग्याचे लेणं फेकून अपमान न करता पुरवठा विभाग व शासनाला निषेध म्हणून बांगड्यांचा आहेर भेट देत महिला आघाडीतर्फे निदर्शने आंदोलन केल्याचे सांगण्यात आले. आंदोलनात शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाठ, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, उपशहर संघटक विद्या भालशंकर, उपतालुका संघटक उज्ज्वला सोनवणे, उपतालुका संघटक सुनीता तळेले, उपशहर संघटक शारदा भोई, उपशहर संघटक यशोदा माळी, भारती हिवराळे पदाधिकारी महिलांसह वैशाली चोपडे, अलका गुरचळ, नंदिनी बोदडे, ज्योती गुरचळ, इंदुबाई तायडे, कुसुम बोदडे, जनाबाई बोदडे, संगीता रोटे, भारती तायडे, इंदूबाई बोदडे, रेखा फुलपगारे, अंजू बोदडे आदी महिला तसेच तालुकाप्रमुख छोटू भोई, गोपाळ सोनवणे, शहरप्रमुख गणेश टोंगे, गटनेता राजेंद्र हिवराळे, शहर संघटक वसंत भलभले, संतोष माळी, शुभम तळेले, भूषण वानखेडे उपस्थित होते.