शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी केली पोलिसाची धुलाई

By admin | Updated: March 10, 2017 00:18 IST

पारोळा : वाहनचालकाला मारहाण करणे पडले महाग

पारोळा : चार चाकीला  धक्का लागल्याच्या कारणावरून एका तीन चाकी वाहनधारकाला बेदम मारहाण करणा:या पोलिसाची महिलांनी यथेच्छ धुलाई केली. हा प्रकार  अमळनेर-पारोळा रस्त्यावरील भिलाटी दरवाजाजवळ गुरुवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडला. या प्रकाराची शहरात दिवसभर खमंग चर्चा सुरू होती.द्राक्षे घेऊन येणारी तीनचाकी गाडी अमळनेर रस्त्याकडून भोई गल्लीकडे येत होती. त्याचवेळी पोलिसाची चारचाकी गाडी भोई गल्लीतून अमळनेर रस्त्याकडे येत होती. पोलिसाच्या गाडीला द्राक्षाच्या गाडीचा धक्का लागला. गाडीला खरचटले गेल्याने पोलिसाचा पारा चढला. त्याने गाडीतून खाली उतरत तीनचाकी वाहनचालकाकडे पाच हजार रूपयांची भरपाई मागितली. त्या गाडीवाल्याने नकार देताच पोलिसाने त्याला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. तो विनवणी करीत असतानाही पोलिसाचा संताप कमी होत नव्हता. त्या परिसरातील महिला, युवकांनी पोलिसाची समजूत काढण्याचा प्रय} केला. मात्र पोलीस ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे महिलांचाही संयम सुटला. अखेर महिलांनी  तीन चाकी वाहनधारकाला मारणा:या पोलिसाची यथेच्छ धुलाई केली. दरम्यान, मार खाणारा पोलीस हा पारोळा तालुक्यातील रहिवाशी असून, सध्या तो जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे समजले. यापूर्वीही त्याने अशीच दादागिरी केल्याची घटना घडलेली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. (वार्ताहर)