सुनसगाव बुद्रूक येथे स्वाइन फ्लू सदृश आजाराने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:17 IST2018-10-25T16:15:45+5:302018-10-25T16:17:35+5:30
सुनसगाव बुद्रूक येथील बेबाबाई पांडुरंग महाजन (वय ५२) या महिलेचा स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने मृत्यू झाला.

सुनसगाव बुद्रूक येथे स्वाइन फ्लू सदृश आजाराने महिलेचा मृत्यू
ठळक मुद्दे१५ दिवसांपासून सुरु होते जळगावात उपचारनाशिक येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यूशोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
नेरी ता.जामनेर : सुनसगाव बुद्रूक येथील बेबाबाई पांडुरंग महाजन (वय ५२) या महिलेचा स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने मृत्यू झाला.
गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या तब्येतीत फरक जाणवत नसल्याने त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने गेल्या मंगळवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.
गावातील अन्य चार ते पाच रुग्ण जळगाव ला उपचारासाठी दाखल असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. बेबाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. येथील पांडुरंग महाजन यांच्या त्या पत्नी होत.