सोन्याच्या दागिन्यासह ५० हजार रुपये असलेली पर्स महिला बसमध्येच विसरली; पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:45 IST2025-04-02T16:45:14+5:302025-04-02T16:45:34+5:30

सासरी जात असताना ही महिला सोन्याच्या दागिन्यासह ५० हजार रुपये असलेली पर्स बसमध्येच विसरुन गेली होती.

Woman forgets purse containing gold jewellery worth Rs 50 thousand in st bus | सोन्याच्या दागिन्यासह ५० हजार रुपये असलेली पर्स महिला बसमध्येच विसरली; पुढे काय घडलं?

सोन्याच्या दागिन्यासह ५० हजार रुपये असलेली पर्स महिला बसमध्येच विसरली; पुढे काय घडलं?

Jalgaon ST Bus : भडगाव येथील वाक येथून माहेरी आलेल्या महिलेची जवळपास दोन लाखांचा ऐवज असलेली पर्स बसवाहकाने प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. अंकिता किशोर पाटील या जळगाव-बहाळ एसटी बसने गुढे येथे सासरी जात असताना सोन्याच्या दागिन्यासह ५० हजार रुपये असलेली पर्स बसमध्येच विसरुन गेल्या होत्या. ही घटना सोमवारी सायंकाळी ७:२० वाजेच्या सुमारास घडली. 

दुसऱ्या दिवशी हा विषय लक्षात येताच अंकिता यांचे वडील जे. के. पाटील यांनी चौकशी केली. वाहतूक नियंत्रक सतीश संदानशिव यांनी चौकशी केली. वाहक अरविंद जाधव (नालबंदी,) यांनी पर्ससह सोन्याचे दागिने व पैसे ठेवलेले असल्याचे सांगितले.

पाटील कुटुंबियांनी मांडले वाहकाचे आभार

मंगळवारी उध्दव सेनेच्या कार्यालयात दुपारी १ वाजता जिल्हा बँकेचे संचालक मेहताबसिंग नाईक, अंकिता पाटील, जे. के. पाटील यांच्या कुटुंबामार्फत बसचे वाहक अरविंद जाधव (नालबंदी) यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी शिवसेना शहर प्रमुख मनोहर चौधरी, नाना पाटील, भूषण पाटील, नवल राजपूत, दीपक राठोड हजर होते. जे. के. पाटील यांच्या कुटुंबाने वाहकांचे आभार मानले. वाहक अरविंद जाधव (नालबंदी, ता. भडगाव) यांनी सोन्याचे दागिने, ५० हजार रुपये असा २ लाखांचा ऐवज प्रामाणिकपणे परत केला.

Web Title: Woman forgets purse containing gold jewellery worth Rs 50 thousand in st bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.