बोदवड येथे ‘मॉर्निंग वॉक’ला जाणारी महिला ट्रकच्या धडकेत ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:50 IST2018-09-08T12:42:19+5:302018-09-08T12:50:50+5:30
पहाटेची घटना

बोदवड येथे ‘मॉर्निंग वॉक’ला जाणारी महिला ट्रकच्या धडकेत ठार
जळगाव : सकाळी फिरायला जात असताना (मॉर्निंग वॉक) अज्ञात ट्रकने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या सुलोचना रामभाऊ पाटील (६०, रा. बोदवड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बोदवड येथील जामनेर रस्त्यावर झाला.
सुलोचना पाटील या सकाळी फिरायला जात होत्या. त्या वेळी त्यांना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा एक हात व पाय निकामी झाला. बराच वेळ झाला तरी त्या घरी न आल्याने त्यांचा मुलगा नाना पाटील हे त्यांना शोधायला गेले असता त्या जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्या वेळी त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.