चाकूचा धाक दाखवून मोबाइलसह रोख रक्कम हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 14:40 IST2019-06-02T14:39:58+5:302019-06-02T14:40:54+5:30

भुसावळ , जि.जळगाव : दोन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून रोख दोन हजार रुपये व मोबाइल हिसकावल्याची घटना शनिवारी ...

Withdrawal of cash with mobile was stabbed with a knife | चाकूचा धाक दाखवून मोबाइलसह रोख रक्कम हिसकावली

चाकूचा धाक दाखवून मोबाइलसह रोख रक्कम हिसकावली

ठळक मुद्देदोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखललाल चर्चजवळील भरदुपारची घटना

भुसावळ, जि.जळगाव : दोन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून रोख दोन हजार रुपये व मोबाइल हिसकावल्याची घटना शनिवारी दुपारी अडीचला शहरातील लाल चर्चजवळ घडली.
सूत्रांनुसार, फारूक अब्दुल्ला अजित कुरेशी (वय ५५, रा. नालंदानगर) हे १ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरी जात होते. तेव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी रेल्वे स्थानकासमोर लाल चर्चजवळ त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखवून खिशातील दोन हजार रुपये तसेच मोबाइल हिसकावून पलायन केले.
यासंदर्भात कुरेशी यांनी शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्याद दिली. त्यावरून दोन अज्ञान इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल साहील तडवी करीत आहे.

Web Title: Withdrawal of cash with mobile was stabbed with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.