शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला घ्यायला गेलेले परत घरी आलेच नाही, दोन भावंडासह पत्नी अपघातात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 19:49 IST

Road Accident : बाजार समीतीसमोर विचीत्र अपघात : मालवाहू वाहनाने मागून दुचाकीला दीली धडक

ठळक मुद्देमागून धडक दिल्याने दुचाकी पुढे चालणाऱ्या मालवाहू वाहनावर धडकली होती.

जळगाव : एकाच दुचाकीने बाजार समीतीत भाजीपाला घेण्यासाठी निघालेल्या श्यामलाल शहादूलाल केवट (वय ४०) त्यांची पत्नी नेवस्वा श्यामलाल केवट (वय ३८) व भाऊ दीपक शहादूलालकेवट (३५) सर्व रा. कैथा ता. अमिलिहा, रिवा , मध्यप्रदेश ह.मु. सिंधी कॉलनी या तीघांच्या दुचाकीला मागून आलेल्या मालवाहू वाहनाने धडक दील्याने ते पती-पत्नी जागीच ठार झाले तर भाऊ दीपक याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी पहाटे पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समीतीसमोर झाला. मागून धडक दिल्याने दुचाकी पुढे चालणाऱ्या मालवाहू वाहनावर धडकली होती.

सूत्रांनी दीलेली माहीती अशी की, श्यामलाल शहादूलाल केवट हे  पत्नीसह दोन मुली व मुलगा यांच्यासह सिंधी कॉलनीत वास्तव्याला होते. श्यामलाल हे महेंद्र मकरेजा यांच्या जीत बेकरी मध्ये गेल्या १५ वर्षांपासून कामाला होते तर पत्नी नेवस्वा या भाजीपाला विक्री करुन कुटुंबाला हातभार लावायच्या. श्यामलाल यांचे भाऊ दीपक केवट हे देखील भाजीपाला विक्री करण्याचे काम करायचे. भाजीपाला घेण्यासाठी ते दररोज  कृषी उत्पन्न बाजार समितीत जायचे. बुधवारी सकाळी ४.३० वाजता श्यामलाल केवट हे पत्नी नेवस्वा आणि भाऊ दीपक सोबत दुचाकीने (क्र.एमएच १९ एडब्ल्यू ७९६२) ने भाजीपाला घेण्यासाठी निघाले असता पाच वाजता औद्योगीक वसाहतीच्या दिशेने जात असतांना पलीकडून येणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिली. याचवेळी या वाहनाच्या पाठीमागे दुसरे वाहन येत होते. अपघातग्रस्त वाहनाचे अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागील वाहन त्यावर आदळले. या अपघातात दुचाकी चालक श्यामलाल केवट व त्याच्या मागे बसलेली पत्नी नेवस्वा केवट हे दोघे जागीच ठार झाले. तर भाऊ दीपक केवट हे गंभीर जखमी झाले. दीपक यांना तातडीन डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता सकाळी ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहीती मीळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे रात्रपाळीचे कर्मचारी शीवदास चौधरी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नी -पत्नी जागेवरच मृत झालेले होते तर जखमी दीपक यांना गोदावरी रुग्णालयात हलवीले.अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात आणण्यात आले. सहायक पोलीस नीरीक्षक संदीप हजारे व हवालदार शीवदास चौधरी यांनी पंचनामा केला.

आई, वडीलांचा मृतदेह पाहून मुलीने फोडला हंबरडाअपघाताची माहीती मीळाल्यानंतर मुलगी नेहा हीने रुग्णालयात धाव घेतली. आई, वडीलांचा मृतदेह पाहून तीने हंबरडा फोडला. तीच्या या आक्रोशाने उपस्थीतांचेही डोळे पानावले होते. श्यामलाल यांच्या पश्यात २मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मुलीच्या लग्नासाठी पैश्यांची जमवाजमव करण्यासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून पती-पत्नी मिळेल ते काम करत होते. मोठी मुलगी यंदा दहावीच्या वर्षाला आहे. मात्र काळाच्या घालाने दाम्पत्याने पाहिलेले स्वप्न पुर्णपणे भंगले. श्यामलाल हे बेकरीत एक उत्कृष्ठ बेकरीचे कारागीर होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalgaonजळगावPoliceपोलिस