मुक्ताईनगर तालुक्यात ट्रॅक्टर-जीप अपघातात पत्नी ठार, पती जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:21 IST2018-12-15T17:20:30+5:302018-12-15T17:21:50+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्यालगत खडी वाहून नेणाºया ट्रॅक्टर व जीप यांच्यात झालेल्या अपघातात दहीहंडी, ता.जि.बºहाणपूर येथील महिला ठार, तर तिचा पती जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

मुक्ताईनगर तालुक्यात ट्रॅक्टर-जीप अपघातात पत्नी ठार, पती जखमी
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील नायगाव फाट्यालगत खडी वाहून नेणाºया ट्रॅक्टर व जीप यांच्यात झालेल्या अपघातात दहीहंडी, ता.जि.बºहाणपूर येथील महिला ठार, तर तिचा पती जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.
आशाबाई सुभाष कोळी (वय ४०) असे मयत महिलेचे नाव आहे. तिचे पती सुभाष काशिनाथ कोळी (वय ४२) रा.दहीहंडी, ता.बºहाणपूर हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना जळगाव येथे अधिक उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
सुभाष काशिनाथ कोळी हे त्यांच्या पत्नी व नातेवाईकांसोबत मुक्ताईनगरकडे एमपी-१२-ए-७५५५ या क्रमांकाच्या जीपने येत होते. नायगाव फाट्याजवळ मुक्ताईनगर येथील महावीर दिलीपचंद्र बोथरा यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरने गिट्टी घेऊन जात होते. अचानक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे उजव्या बाजूचे फडके उघडले. जीपवर आदळले. यामुळे अपघात घडला. अपघात इतका जबर होता की, जीपची उजवी बाजू चक्काचूर झाली, तर महिलेला जीव गमवावा लागला.