पत्नी देवपुजा अन् पती प्राणायाम करीत असताना जळगावात झाली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:42 IST2018-10-16T21:40:42+5:302018-10-16T21:42:17+5:30
उघड्या घरातून ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी अयोध्यानगरात घडली.

पत्नी देवपुजा अन् पती प्राणायाम करीत असताना जळगावात झाली चोरी
जळगाव : पत्नी देवघरात तर पती गच्चीवर प्राणायाम करीत असताना चोरट्यांनी वासुदेव जगन्नाथ जगताप (वय ३५) यांच्या उघड्या घरातून ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी अयोध्यानगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वासुदेव जगताप हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरीला आहेत. मंगळवारी सकाळी ६.३० वाजता ते गच्चीवर प्राणायाम करीत होते, तर पत्नी अनिता या देवघरात पूजा करीत होत्या. मुलगा भूषण हा शेवटच्या खोलीत झोपलेला होता. घर उघडे असल्याची संधी साधून चोरट्यांनी चार्जिंगला लावलेला पत्नी अनिता यांचा १९ हजार ५०० रुपयांचा तर मुलगा भूषण याचा ९ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला.