जळगाव - महानगरपालिकेवर भाजपाचे कमळ फुलणार की शिवसेनेचा भगवा फडकणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मनपाच्या ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचा भवितव्याचा शुक्रवार, ३ आॅगस्ट रोजी फैसला होणार आहे.मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, १ आॅगस्ट रोजी मतदान झाले. ५५.७२ टक्के मतदान झाले. आता शुक्रवार, ३ रोजी मतमोजणी आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून, एमआयडीसीतील ई-८ सेक्टर गोडावूनमध्ये सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.संपूर्ण मतदान प्रक्रिया चार ते पाच तासात पूर्ण होणार असल्याचा दावा देखील मनपा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. फेरीनिहाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार असून, प्रभाग क्रमांक १९ च्या सर्वात कमी ८ फेऱ्या होणार असल्याने या प्रभागाचा निकाल सर्वात प्रथम जाहीर केला जाणार आहे. तर प्रभाग क्रमांक ५ च्या १७ फेºया होणार असल्याने या प्रभागाचा निकाल सर्वात शेवटी जाहीर होण्याची शक्यता आहे.
जळगाव महापालिकेवर वर्चस्व सुरेशदादांचे की गिरीश महाजनांचे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 19:01 IST
जळगाव महानगरपालिकेवर भाजपाचे कमळ फुलणार की शिवसेनेचा भगवा फडकणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
जळगाव महापालिकेवर वर्चस्व सुरेशदादांचे की गिरीश महाजनांचे ?
ठळक मुद्देजळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाची उत्सुकताऔद्योगिक वसाहत भागातील ई-८ सेक्टरमध्ये मतमोजणीनिवडणूक रिंगणातील उमेदवारांची वाढली धाकधूक