विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवायला गेला अन् त्यानेच घेतला वन कर्मचाऱ्याला चावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 19:24 IST2025-10-22T19:24:44+5:302025-10-22T19:24:56+5:30
कोल्ह्याला बाहेर काढत असताना त्याने एका कर्मचाऱ्याला चावा घेतला

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवायला गेला अन् त्यानेच घेतला वन कर्मचाऱ्याला चावा
गोपाळ व्यास
बोदवड ( जि. जळगाव ) - विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवताना त्याने वन कर्मचाऱ्याला चावा घेऊन जखमी केले. ही घटना वाकी तालुका बोदवड येथे बुधवारी दुपारी घडली
बोदवड शिवारात प्रमिला नामदेव सोनार यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या सुमारास कोल्हा पडला होता. ते दुपारी शेतात गेले असता त्यांना विहिरीत कोल्हा दिसून आला. त्यांनी वनविभागाला कळविले. वनपाल अरविंद धोबी हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. कोल्ह्याला बाहेर काढत असताना त्याने एका कर्मचाऱ्याला चावा घेतला आणि विहिरीतून बाहेर निघताच जंगलात धूम ठोकली. जखमी वन कर्मचाऱ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.