शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जळगावात शतपावली करताना महिलेला भरधाव दुचाकीस्वाराने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:15 PM

जिल्हा क्रीडा संकुलानजीक अपघात

ठळक मुद्देसाडेपाच तास मृत्यूशी झुंजदुचाकीस्वार तरुणही जखमी

जळगाव : रात्री जेवण झाल्यानंतर पतीसह शतपावली करीत असताना सविता विकास बिर्ला (वय ५२, रा.नवी पेठ, जळगाव) यांना मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने उडविल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारानजीक घडली. दरम्यान, साडेपाच तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी पहाटे साडेतीन वाजता सविता यांची प्राणज्योत मालवली.दुचाकीस्वार तरुणही जखमीसविता बिर्ला यांना धडक देणारा तुषार चौधरी हा तरुण देखील या अपघातात जखमी झाला आहे. डोक्याला व पाठीला त्याला मार बसला आहे. बिर्ला दाम्पत्य हे जुन्या एम्लॉयमेंट कार्यालयाच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाल्याचे जखमी तरुणाचे म्हणणे आहे. तुषार हा आयटीआयचा विद्यार्थी आहे. मित्र विजय पवार याला सोबत घेऊन रेल्वे स्टेशनकडे जात असताना ही घटना घडल्याचे तुषारचे म्हणणे आहे.दुचाकीची जीवघेणी गतीया अपघातात तुषार चौधरी या तरुणाच्या दुचाकीची गती अतिशय खूप मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे या अपघातात दुचाकी दुभाजकावर आदळून तीन वेळा पलटी झाली. त्यात तो बचावला.मुलांचा लाड करण्यासाठी जीवघेण्या दुचाकी पालक त्यांच्या हातात देतातच कसे? असा सवाल मनिष बाहेती यांनी उपस्थित केला आहे. पाल्यांचा जीव धोक्यात जावू शकतो याची जाणीव असतानाही १६० सीसीच्या दुचाकी पालकांकडून पाल्यांना दिल्या जात आहेत.भरधाव वाहने उठली जीवावर; २० वर्षांपासूनची शतपावली थांबलीयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नवीपेठेतील निखिल एजन्सीचे (तेलाचे दुकान) मालक विकास केदारनाथ बिर्ला व त्यांची पत्नी सविता हे दाम्पत्य रविवारी रात्री दहा वाजता जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी नवीन बसस्थानक परिसरात आले होते. तेथून परत घराकडे जात असताना जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने (एमएच १९- डीबी ०२२१) सविता यांना जोरदार धडक दिली. दरम्यान, सविता व पती विकास हे गेल्या २० वर्षांपासून याच रस्त्यावर दररोज शतपावली करीत होते, मात्र आता ती थांबली आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव