राष्ट्रवादीच्या सभेत ४६ जणांचे पाकीट चोरीस
By संजय पाटील | Updated: June 16, 2023 21:19 IST2023-06-16T21:19:44+5:302023-06-16T21:19:50+5:30
चार जणांना अटक.

राष्ट्रवादीच्या सभेत ४६ जणांचे पाकीट चोरीस
अमळनेर (जि. जळगाव) :राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी आयोजित रोड शो आणि सभेत ४६ जणांचे पैसे, पाकीट, मोबाईल चोरीस गेले आहेत. पोलिसांनी चार जणांना चोरी करताना पकडले आहे.
समीर शहा सलीम शहा (२२, रा. रामदेवबाबा नगर धुळे) , हमीदअली मोहम्मद अली उमर (४२ रा. रोशनबाग मालेगाव), उमर फारुख शेख लतीफ ( २२, रा.आझाद नगर मालेगाव) आणि , भैया विक्रम खैरनार (३८, रा. बालाजी नगर, शिरपूर) अशी या चोरट्यांची नावे आहेत. गौरव उदय पाटील यांच्या खिशातील जवळपास २० हजार रुपये चोरले आहेत.