यावल तालुक्यातील साकळी येथे घराची भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:00 IST2019-12-15T00:59:15+5:302019-12-15T01:00:41+5:30
साकळी येथील एका घराची भिंत कोसळून वृद्ध महिला गंभीररित्या जखमी झाली़

यावल तालुक्यातील साकळी येथे घराची भिंत कोसळली
ठळक मुद्देवृद्ध महिला जखमी भरदुपारची घटना
चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : साकळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगराच्या समोरील भागातील एका घराची भिंत कोसळून मोगाबाई समरद सुरवाडे ही ६५ वर्षीय वृद्ध महिला गंभीररित्या जखमी झाली़ ही घटना १३ रोजी दुपारी घडली. जखमी महिलेवर जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
ही घटना घडण्यापूर्वी या ठिकाणी लहान मुलेही खेळत होती. मात्र या मुलांचे दैव बलवत्तर होते म्हणून घटना घडण्यापूर्वीच ही मुलं बाजूला खेळायला निघून गेलेली होती.